शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

'मुख्यमंत्र्यांसमोर महाराष्ट्रात कुठेही निवडणूक लढा, तुमचा पराभव निश्चित', शिंदे गटाच्या आमदाराचा आदित्य ठाकरेंना टोला

By मुरलीधर भवार | Published: February 19, 2024 2:42 PM

Shiv Sena News: महाराष्ट्रात कुठेही आदित्य ठाकरे यांनी  एकनाथ शिंदे यांच्यासमोर निवडणूक लढविली तर ठाकरे यांचा पराभवच होणार असा टोला शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांना आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

- मुरलीधर भवारकल्याण - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्य आणि ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे वय यांच्यात बरीच तफावत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे नेतृत्व आणि कतृत्व ठाणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात आहे. ते रडत होते तर तुम्ही कशाला दिले. इतेकच नाही तर महाराष्ट्रात कुठेही आदित्य ठाकरे यांनी  एकनाथ शिंदे यांच्यासमोर निवडणूक लढविली तर ठाकरे यांचा पराभवच होणार असा टोला शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांना आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

रविवारी आदित्य ठाकरे हे ठाण्यात आले होते. त्यांनी शिंदे यांच्यावर टिका केली होती. या टिकेला आत्ता कल्याणचे शिवसेना आमदार भोईर यांनी सांगितले. आदित्य ठाकरे सध्या सुसाट सुटले आहे. ते एका पक्षाचे युवा नेते आहेत. त्यांना बोलणे भाग पडते. ते बोलले शिवाय त्यांचे लोक त्यांना सोडून जातील. त्यांच्याजवळ राहणार नाही. त्यामुळे त्यांचे चालू असते. एकनाथ शिंदे यांनी रडून पद मिळविले. तुम्ही द्यायचे नव्हते. तुम्ही का दिले. त्यांचे नेतृत्व आणि कर्तूव ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराषट्राला माहिती आहे. त्याच बेसवर तुम्ही त्यांना जे द्यायचे होते. ते दिले. ते रडत होते तर तुम्ही द्यायचे नव्हते. मुख्यमंत्र्यांच्यासमोर ते महाराष्ट्रात कुठेही उभे राहू शकत नाहीत. शिंदे साहेबांचे जे काम आहे.

ते काम यांनी मागच्या पाच वर्षात सत्तेत असताना केले नाही. अडीच वर्षाच्या सत्तेतही केल नाही. जनता मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ठामपणे उभी. त्यांच्या योजना काम करण्याची आणि प्रत्येकाला काम देण्याची पद्धत, मुख्यमंत्री असताना सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून काम करणे हे त्यांच्या रक्त्तात आहे. ते आदित्य ठाकरे यांना जमणार नाही. त्यामुळे त्यांनी उभे राहावे. डिपा’झिट जप्त झाले नाही तर ठाकरे पडणार हे नक्की असा दावा आमदार भोईर यांनी केला आहे. 

उद्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलावले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल काएणाचेही दुमत नाहीत फक्त एकच म्हणणे आहे की, मराठा समाजाला आरक्षण देत असताना अन्य कोणत्या समाजाचे आरक्षण कमी करु नये. मराठा समाजाचा आक्रोश आंदोलनाची दखल घेतली आहे. भर सभेत मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती. गरजवंत आहेत. त्यांना आरक्षण मिळावे असे आमदार भोईर यांनी सांगितले.

कल्याणमधील  माघी गणेशोत्सवाचे खास वैशिष्ट आहे. गणेश विसर्जन मिरवणूक मोठी असते. मुख्यमंत्री या ठिकाणी या आधीही आले आहेत. अनेक वेळा ते विसर्जन मिरवणूकीला येतात. त्यामुळे आज संध्याकाळी ते विसर्जन मिरवणूकीस येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही ३६५ दिवस साजरी केली पाहिजे असेही आमदार भोईर यांनी सांगितले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेAditya Thackreyआदित्य ठाकरे