शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

अभिहस्तांतरण न करणाऱ्या विकासकांवर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 1:13 AM

गीता जैन यांचे रहिवाशांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा राेड : इमारतीमध्ये जेव्हा सदनिका विकत घेता त्यावेळी विकासकाने तुमच्याकडून जमिनीचेही पैसे घेतलेले असतात. त्यामुळे गृहनिर्माण संस्थेची नोंदणी झाल्यानंतर चार महिन्यांत विकासकाने इमारतीची जमीन संस्थेच्या नावावर हस्तांतरित न केल्यास त्याच्यावर कायद्यानुसार गुन्हे दाखल करा, असे आवाहन आमदार गीता जैन यांनी केले आहे. मीरा-भाईंदरमधील दहा हजार ८०० पैकी तब्बल नऊ हजार गृहनिर्माण संस्थांच्या जमिनींचे हस्तांतरण झालेले नसल्याचे आमदार गीता यांनी सांगितले.

गृहनिर्माण संस्थांना इमारतीची जमीन त्यांच्या नावे मालकीची करण्यासाठी मानवी अभिहस्तांतरण योजनेंतर्गत विशेष मोहिमेनुसार एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाईंदरच्या मॅक्सस सभागृहात झालेल्या गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारी व रहिवाशांच्या या मेळाव्यास सहकारी संस्था - ठाणे जिल्हा उपनिबंधक किरण सोनावणे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोले, विनायक साखरे, विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील आदी उपस्थित होते. आमदार जैन म्हणाल्या की, शहरात सोसायट्यांना जमिनीच्या हस्तांतरणात सर्वात मोठी अडचण ही इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या ना-हरकत पत्राची येत आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत. यूएलसी व एनएचे पैसे भरण्याची जबाबदारी विकासकाची असताना विकासक ते भरत नाहीत व त्याचा बोजा रहिवाशांच्या माथी पडतो. त्यामुळे अशा विकासकांना नव्याने इमारती बांधण्याच्या परवानग्या देण्यात येऊ नये. यापुढे उपनिबंधक हे आठवड्यातून एक दिवस शहरात येतील. जेणेकरून लोकांना ठाण्याला जावे लागणार नाही. दिलीप ढोले म्हणाले की, ग्रामपंचायत काळापासून महापालिकेपर्यंत ज्या ज्या इमारतींची कागदपत्रे पालिकेकडे असतील ती संस्थांना दिली जातील.

‘तुम्हाला सक्रिय बनावे लागेल’nउपनिबंधक सोनावणे म्हणाले की, विकासक जमीन हस्तांतरित करून देत नसल्याने २००८ मध्ये डिम कन्व्हेन्स कायदा आला आणि २०११पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. अभिहस्तांतरण नसेल आणि तुमची इमारत पाडण्यात आली तर जमिनीवर पुन्हा विकासकाचा हक्क राहतो. त्याच लालसेपाेटी विकासक हस्तांतरण करत नाही. nचटईक्षेत्र घेऊन तुमच्या इमारतीवर आणखी मजले वाढवतो. हस्तांतरणाचा आदेश झाला की तुम्हाला मुद्रांक शुल्क भरून नंतर सातबारावर तुमचे नाव लावून घ्यावे लागेल. आदेश होऊनही सातबारावर नाव चढवले जात नसेल तर मला कळवा. मी जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीसमोर विषय ठेवेन. या कामासाठी तुम्हाला सक्रिय बनावे लागेल. जागरूक राहावे लागेल, असे सोनावणे म्हणाले. 

टॅग्स :thaneठाणेMLAआमदार