शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

ठाणे महापालिका आयुक्तांविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 5:57 AM

ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप करणारी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने संबंधित मुलीचा जबाब नोंदविण्याचे निर्देश पोलिसांना सोमवारी दिले.

मुंबई - ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप करणारी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने संबंधित मुलीचा जबाब नोंदविण्याचे निर्देश पोलिसांना सोमवारी दिले.संजीव जयस्वाल रात्री उशिरापर्यंत आपल्याकडून बॉडी मसाज करून घेत, असा आरोप एका १५ वर्षाच्या मुलीने केला आहे. याची व्हिडीओ क्लीप सगळीकडे व्हायरल झाली. त्यानंतर जयस्वाल यांनी सूडबुद्धीने मुलगी राहत असलेली झोपडी तोडली, असा आरोप तिच्या आईने केला आहे.एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने जयस्वाल यांच्यावर पॉक्सोअंतर्गत कारवाई करण्यात यावे, अशी विनंती ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते विक्रांत कर्णिक यांनी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. आर. एम. सावंत व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे होती. उच्च न्यायालयाने हा आरोप गंभीर स्वरुपाचे आहे, असे म्हणत एसीपी पद्मजा चव्हाण यांना संबंधित मुलीचा जबाब नोंदविण्याचे निर्देश दिले. याचिकेनुसार, मुलीच्या आईने याबाबत मानपाडा पोलीस ठाणे व पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. मात्र, कोणीही या तक्रारीची दखल घेतली नाही. अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या महिला पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी विनंतीही याचिकाकर्त्यांनी केली आहे.

टॅग्स :thaneठाणेcommissionerआयुक्तMumbai High Courtमुंबई हायकोर्ट