शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

केडीएमसीच्या लाचखोर अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 12:26 AM

अनधिकृत बांधकाम प्रकरण: कारवाई करण्यासाठी मागितली होती लाच

कल्याण : स्वमालकीच्या जागेवर केलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी तक्रारदाराकडे दोन लाख रुपयांची लाच मागणाºया डोंबिवलीतील ह प्रभाग क्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर कंखरे आणि पर्यवेक्षक गजानन आगवणे या दोघांविरोधात विष्णूनगर पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला. केडीएमसी अधिकारी आणि पर्यवेक्षकाने लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने वर्षाची सुरुवातच पालिकेतील भ्रष्टाचाराच्या वृत्ताने झाली आहे.व्यवसायाने इस्टेट एजंट असलेल्या तक्रारदाराची कुंभारखाणपाडा परिसरात जमीन आहे. या जमिनीवर करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी तक्रारदाराने कंखरे याच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर, या कारवाईसाठी कंखरे आणि आगवणे या दोघांनी ४ डिसेंबरच्या दुपारी ह प्रभाग कार्यालयात दोन लाखांची मागणी केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.केडीएमसी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असून, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याची ओरड लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. दुसरीकडे अधिकारी कागदी घोडे नाचवत असल्याचे दिसून येते. या बांधकामांवर कारवाई न करण्यासाठी बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कचाट्यात सापडले आहेत.केडीएमसीतील भ्रष्टाचाराबाबत सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी सरकारदरबारी वेळोवेळी तक्रारी केल्या. मात्र, त्यांच्यावर ठोस कारवाई झाली नाही. यापूर्वीही पालिकेतील अनेक अधिकारी, कर्मचारी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालण्यासाठी लाच स्वीकारताना पकडले गेले असून यात अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांचादेखील समावेश आहे. मात्र, तरीही केडीएमसीला लागलेली भ्रष्टाचाराची कीड थांबता थांबत नाही.केडीएमसीला लागलेली भ्रष्टाचाराची कीड दिवसेंदिवस वाढतच आहे. यामध्ये केवळ कर्मचारीच नव्हे तर येथील वरिष्ठ दर्जाचे अधिकारीही सामील असल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. याबाबत शासनदरबारी तक्रारी करुनही ठोस कारवाई झालेली नाही.केडीएमसीतील लाचखोरांचा इतिहासवर्ष अधिकारी लाचेची रक्कमनोव्हेंबर ११९७ कार्यकारी अभियंता सुनील जोशी ५ लाखनोव्हेंबर १९९७ उपअभियंता जयवंत म्हात्रे ६० हजारजानेवारी १९९९ कनिष्ठ अभियंता धोंडिबा कातकर १२ हजारएप्रिल २००० उपायुक्त सुरेश पवार २ लाख ५० हजारफेब्रुवारी २०१४ प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडे ३ लाखएप्रिल २०१४ उपअभियंता दत्तात्रेय मस्तूद ४ लाखनोव्हेंबर २०१६ सहायक आयुक्त गणेश बोराडे १ लाख ५० हजारनोव्हेंबर २०१६ उपअभियंता प्रकाश चौधरी १० हजारजुलै २०१७ प्रभागक्षेत्र अधिकारी स्वाती गरुड २५ हजारजून २०१८ संजय घरत ८ लाख

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका