कल्याण : आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनीच्या आवारातील कामगार वसाहतीतील पाडकाम सुरू असताना अदानी समूहाच्या सुरक्षा रक्षक आणि पोलिसांवर संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत अदानी समूहाचे सुरक्षा रक्षक जखमी झाल्याबाबत सुमारे ६० कामगारांच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंपनीत अंतर्गत सुरक्षा व्यवस्था पाहणारे हरेश्वर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कंपनीच्या वसाहतीमधील घरांमध्ये काही लोक बेकायदेशीर राहत असून त्यांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजाविण्याकरिता १३ सुरक्षा रक्षकांसह अन्य सुरक्षा विभागाचे अधिकारी गेले असता त्यांना कामगारांच्या जमावाने विरोध केला. या वेळी सुरक्षा रक्षकांच्या गाडीवर संतप्त कामगारांनी दगडफेक केली. या दगडफेकीत सुरक्षा रक्षक जखमी झाले. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी फरीदा पठाण, प्राजक्ता कुळधरण, माधुरी आव्हाड, राजेश त्रिपाटी, आशा पाटील यांच्यासह ६० जणांच्या विरोधात दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल केला. अदानी उद्योग समूहाच्या प्रवक्त्याने सांगितले की, अंतर्गत सुरक्षा रक्षकांकडून दगडफेक केली गेली नसून माधुरी आव्हाड या कामगारांनी केलेल्या दगडफेकीत जखमी झाल्या आहेत.
........
वाचली.