शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

पालिकेतील ९६४ रिक्त पदे कंत्राटावर भरण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:22 AM

मीरा-भाईंदर महापालिकेत मंजूर पदांनुसार सध्या ९६४ पदे रिक्त असल्याची आरटीआय कार्यकर्ते कृष्णा गुप्ता यांनी माहिती अधिकारातून उघड केली आहे.

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेत मंजूर पदांनुसार सध्या ९६४ पदे रिक्त असल्याची आरटीआय कार्यकर्ते कृष्णा गुप्ता यांनी माहिती अधिकारातून उघड केली आहे. परंतु, ती पदे कंत्राट पद्धतीवरच भरण्याचा घाट प्रशासनाकडून घातला जात आहे. ठोक मानधनासह कंत्राटावर कार्यरत कर्मचारी व कामगारांमध्ये नाराजी पसरली असून रिक्त पदांवर त्यांनाच प्राधान्याने सेवेत सामावून घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.पालिकेत एकीकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने कामे वेळेवर होत नसल्याचा कांगावा प्रशासनाकडून केला जातो. ‘ड’ वर्गातील पालिकेला राज्य सरकारने विविध संवर्गातील पदे भरण्यास अनुमती दिली आहे. प्रथम वर्गात एकूण ८० पदे मंजूर असून त्यापैकी ३७ पदे अद्याप रिक्त ठेवली आहेत. यातील बहुतांश वैद्यकीय अधिकाºयांची ठोक मानधनावर नियुक्ती केली जाते. त्यांना सरकारी नियमानुसार वेतन व लाभ दिले जातात. इतर काही महत्त्वाची पदे पालिका आस्थापनेवरील अधिकाºयांच्या प्रभारी नियुक्तीने भरली जातात. वर्ग-२ साठी एकूण ५१ पदे मंजूर असून त्यातील २८ पदे अद्यापही रिक्त आहेत. वर्ग-३ साठी एकूण ७३० पदे मंजूर असताना त्यातील २५४ पदे रिक्त ठेवली आहेत. वर्ग-४ मधील एक हजार ५८१ पदांना मंजुरी असून त्यापैकी ६४५ पदे रिक्त ठेवली आहेत.पालिकेत संगणकचालकांची वानवा असतानाही ठोक मानधनावरील ७० संगणकचालक व लघुलेखक आपली सेवा चोखपणे बजावत आहेत. अशातच, पालिकेने २००० मध्ये सफाई कामगारांची कंत्राटी पद्धतीवर भरती केली होती. त्यावेळी राज्य सरकारने एक हजार १८० पदांना मंजुरी दिली होती. त्यापैकी पालिकेकडून केवळ ७०९ कामगारांनाच सेवेत सामावले गेले.भरलेल्या पदांवर काम करणाºयांपैकी काही कामगार मृत, तर काही निवृत्त झाले असून त्यांच्या वारसदारांनाही प्रशासनाने ताटकळत ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. पालिकेकडून सफाई कामगारांना सध्या कंत्राटी पद्धतीवर नियुक्त केले जात असून त्यातही राज्य सरकारच्या लाड समितीने केलेल्या शिफारशीनुसार अद्यापही सुमारे ८०० कामगार कमी पडत आहेत.पालिकेने रिक्त पदे भरण्यासाठी सतत कंत्राटी पद्धतीचा अवलंब केला असून त्यात कंत्राटदाराचेच भले करण्याचा प्रयत्न चालवल्याचा आरोप कर्मचारी व कामगार संघटनांकडून केला जात आहे.वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सफाई कामगारांची संख्या पुरेशी नाही. त्यांच्या नियुक्तीबाबत पाठपुरावा सुरू असून कंत्राटावर काम करणाºया कामगारांना अनुभवानुसार प्राधान्याने रिक्त पदांवर सामावून घ्यावे, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे.- विवेक पंडित, संस्थापक, श्रमजीवी कामगार संघटनापालिकेकडून कंत्राटी कामगारांना स्थायी कामगारांप्रमाणेच लाभ, तर किमान वेतनाप्रमाणेच पगार दिला जातो. त्यामुळे रिक्त पदे कंत्राटावर न भरता ती थेट पालिकेकडूनच भरावीत, तसे निर्देश केंद्र व राज्य सरकार कामगार आयोगाकडून प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच संघटनेद्वारे सतत पाठपुरावा सुरू आहे.- गोविंद परब, पालिका युनिट अध्यक्ष, मीरा-भार्इंदर कामगारसेनारिक्त पदांवर प्राधान्याने कंत्राटी तसेच ठोक मानधनावरील कर्मचारी व कामगारांना सामावून घेण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असला, तरी ठोक मानधनावरील संगणकचालकांचा विषय आमदार नरेंद्र मेहता यांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच मांडण्यात आला आहे. - प्रभाकर गायकवाड,सरचिटणीस, श्रमिक जनरल कामगार संघटना

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर