शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

गाणी, भाषणे, संवाद ऐकत साकारली तैलचित्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:37 PM

महापालिकेचा उपक्रम; ठाणेकर किशोर नादावडेकरांची २३ पोट्रेट

ठाणे : डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या डॉ. घाणेकरांच्या तैलचित्रातील घाणेकरांची नजर आता मी एकटा नाही, हेच जणू सांगत आहे. कारण, आता डॉ. घाणेकर नाट्यगृहात काही दिवंगत, तर काही हयात कलावंत, राजकीय नेते यांच्या तब्बल २३ तैलचित्रांचे अनावरण करण्याचा सोहळा अलीकडेच संपन्न झाला. कलाक्षेत्रातील दिग्गज दिवंगत कलावंत आणि कलेला कायम प्रोत्साहन देणाऱ्या राजकीय नेत्यांची ही हुबेहूब आणि रेखीव तैलचित्रे साकारली आहेत, ठाणेकर चित्रकार किशोर नादावडेकर यांनी.मुंबईतील नाट्यगृहांच्या धर्तीवर ठाण्यातील नाट्यगृहातही नाट्यकर्मींची चित्रे असावी, या उद्देशाने ठाणे महापालिकेने हा उपक्रम हाती घेतला. यापूर्वी गडकरी रंगायतनमध्ये पु.ल. देशपांडे आणि आनंद दिघे यांचे तर घाणेकर नाट्यगृहात डॉ. घाणेकरांचे पूर्णाकृती तैलचित्र आहे. ही चित्रेही नादावडेकर यांनीच साकारलेली आहेत. चित्रकलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण नसतानाही केवळ आवड, सराव आणि कलेची साधना यामुळे चित्रकलेशी ते समरस झाले असून आज चित्रकलेच्या क्षेत्रात राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. ठाणे महानगरपालिकेने मला २३ तैलचित्रे काढण्यास सांगितल्यावर गेले पाचसहा महिने मी त्यावरच काम करीत होतो. या दिग्गजांची माहिती, नातेवाइकांशी चर्चा करून त्यांचे विविध फोटो मिळवले. इतकंच नव्हे तर त्यांचे चित्र कॅनव्हॉसवर रेखाटताना मी कॉम्प्युटरवर त्यांची माहिती किंवा गाणी किंवा त्यांची भाषणे ऐकायचो. त्यामुळे ही सर्व मंडळी माझ्यासमोरच आहेत अथवा माझ्याशी गप्पा मारत आहेत, असा भास मला व्हायचा, असे मत किशोर नादावडेकर यांनी व्यक्त केले.यांची आहेत तैलचित्रे : स्वा. विनायक सावरकर, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, अजातशत्रू वसंत डावखरे, पु.ल., शाहीर साबळे, पंडित भीमसेन जोशी, शाहीर विठ्ठल उमप, बालगंधर्व, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, सुलोचनादीदी, प्रभाकर पणशीकर, सुलभा देशपांडे, मच्छिंद्र कांबळी, लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, विनय आपटे, आनंद अभ्यंकर, रीमा लागू, सतीश तारे, रसिका जोशी यांच्या तैलचित्रांनी डॉ. घाणेकर नाट्यगृहाच्या भिंती बोलू लागल्या आहेत.