शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

अखेर वीजनिर्मिती प्रकल्पाचे २७ कोटी कचऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 11:19 PM

ठाणे महापालिकेने डायघर प्रकल्प गुंडाळला : प्रस्ताव महासभेच्या पटलावर

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे  : गेल्या कित्येक वर्षांपासून ठाणे महापालिकेला डम्पिंगचा प्रश्न सतावत आहे. यावर मात करण्यासाठी काही वर्षांपूर्वी डायघर येथे कच-यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शहरातील कच-याचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार, या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्याचे काम आणि संरक्षक भिंतही उभारून सल्लागारही नेमला होता. यावर आतापर्यंत सुमारे २७ कोटींचा खर्च केला आहे. परंतु, महापालिकेला हा प्रकल्प आता खर्चिक वाटू लागला असून त्यांनी तो गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याठिकाणी नवा कोणता प्रकल्प घेता येऊ शकतो, याचा अभ्यास आता महापालिका करणार आहे. 

शहरात आजघडीला सुमारे ९६३ मेट्रिक टन कचरा निर्माण होत आहे. यामध्ये ५१५  मेट्रिक टन ओला, तर ४४१ मेट्रिक टन सुका आणि १२५ मेट्रिक टन सीएनडी वेस्टचा कचरा  (डेब्रिज) आहे. डायघर प्रकल्प लवकर मार्गी लागावा, यासाठी प्रशासनाचे गेल्या १३ वर्षांपासून प्रयत्न सुरू   होते. त्यानुसार तेथे रस्ताबांधणी, वृक्षलागवड आणि संरक्षक भिंतीचेही काम पूर्ण करून सल्लागारही नेमला होता. या सर्वांसाठी तब्बल २७ कोटींचा खर्च आहे. या प्रकल्पातून १३ मेगावॅट वीजनिर्मिती होणार होती. परंतु, मधल्या काळात घनकचरा व्यवस्थापन नियम बदलण्यात आले. २०११ चा नियम बंद होऊन त्याठिकाणी २०१६ चा नवा नियम आला. त्यानुसार, काम करण्यासाठी काही बदल करण्याचे महापालिकेने संबंधित ठेकेदाराला सांगितल्यावर त्याने ते निश्चित केले. परंतु, होणारा खर्च वाढल्यानेच तो आता न परवडणारा झाल्यामुळे पालिकेनेच तो गुंडाळला आहे.

या कारणांमुळे गुंडाळणार प्रकल्पमहापालिका हद्दीत निर्माण होणाऱ्या  कच-यामध्ये जास्त ऊर्जानिर्मिती करणा-या घटकांचे प्रमाण कमी असल्याने त्याचा थेट वीजनिर्मितीवर परिणाम होणार आहे. महावितरणलादेखील एस्क्रो खात्यामध्ये महावितरणला तीन महिन्यांसाठी १९.८ कोटी रक्कम जमा करावी लागणार आहे. परंतु, कोरोनामुळे ते शक्य नाही. त्यातही या वीजनिर्मिती प्रकल्पात नफ्यातील काहीच भाग महापालिकेला मिळणार नव्हता. प्रकल्पासाठी लागणारी जागादेखील जास्त लागत असल्याचे दिसून आले आहे, त्यामुळेदेखील तो राबविणे शक्य नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. शिवाय, यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली व निगा देखभालीकरिता जास्तीचा खर्च असल्याने तो करणे शक्य नाही. याशिवाय, ठेकेदाराकडूनदेखील तो उभारण्यास दिरंगाई झाली. तसेच बदलासाठी ठेकेदाराने ७८ कोटी मागितले होते. दरवर्षी सुमारे आठ कोटी प्रकल्पचालकाला द्यावे लागणार होते. परंतु, कोरोनामुळे हा खर्च करता येणे शक्य नसल्याने अखेर महापालिकेने हा प्रकल्प गुंडाळला असून तसा प्रस्ताव येत्या १९ मार्चच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवणार आहे.

टॅग्स :thaneठाणे