शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...
2
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
3
आज अजित पवारांच्या स्टेजवर जाणार; काँग्रेसच्या निलंबनानंतर आमदार सुलभा खोडकेंची घोषणा
4
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
5
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
6
कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन
7
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
8
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
9
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
10
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
11
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
12
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
13
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
14
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
15
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
16
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
17
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
18
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
19
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट

अखेर विरोधी पक्ष नेतेपदी सेनेच्या राजू भोईर यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 4:28 PM

 मीरा-भार्इंदर महापालिकेत विरोधी पक्षांतील जास्त सदस्य संख्या असलेल्या शिवसेनेच्या वाट्याला अखेर बहुप्रतिक्षेनंतर विरोधी पक्ष नेतेपद आले. महापौर डिंपल मेहता यांनी सेनेच्या राजू भोईर यांची नियुक्ती केल्याचे मंगळवारच्या महासभेत जाहीर केले.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेत विरोधी पक्षांतील जास्त सदस्य संख्या असलेल्या शिवसेनेच्या वाट्याला अखेर बहुप्रतिक्षेनंतर विरोधी पक्ष नेतेपद आले. महापौर डिंपल मेहता यांनी सेनेच्या राजू भोईर यांची नियुक्ती केल्याचे मंगळवारच्या महासभेत जाहीर केले. या नेत्यासाठी पालिका मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील दालनच मिळावे, यासाठी आक्रमक झालेल्या सेनेची मात्र प्रशासनाने बोळवण करुन आयुक्त बी. जी. पवार यांनी पहिल्या मजल्यावर दालन उपलब्ध करुन देण्याचे मान्य केले. 

विरोधी पक्षातील क्रमांक एकचा पक्ष ठरलेल्या शिवसेनेच्या पदरी विरोधी पक्ष नेता पद आले असले तरी सत्ताधारी भाजपाचे आ. नरेंद्र मेहता यांच्या निर्देशानुसार ते रोखून धरण्यात आले होते. या पदावर सेनेचे राजू भोईर हे दावेदार ठरल्याने त्यांना या पदापासून वंचितच ठेवावे, असा प्रयत्न भाजपाने वेळोवेळी केला. यामागे भोईर यांच्या जमीन संपादनाचा मुद्दा असल्याचे सांगितले जात असले तरी भोईर यांना त्यावर विराजमान न करण्याचा डाव भाजपाकडून खेळला जात होता. भाजपाने लटकत ठेवलेल्या या पदावरील नियुक्तीचा मुद्दा सेनेने प्रतिष्ठेचा करुन अनेकदा आंदोलन छेडले. परंतु, त्यात सेनेची आक्रमकता दिसून येत नसल्याने भाजपाने त्यांची सतत बोळवण सुरु ठेवली. त्यातच या नेत्याचे दालन सुरुवातीपासून पालिका मुख्यालयातील दुस-या मजल्यावर असताना ते थेट तळमजल्यावर नेण्याची योजना सत्ताधाऱ्यांनी आखली. त्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होताच जागी झालेल्या सेनेने त्या नेत्याचे दालन दुसऱ्या मजल्यावरच ठेवावे, असा हट्टाहास सुरु केला. त्यासाठी देखील सेनेने सतत आंदोलन छेडून ते दालन खुले करुन त्याचा अनौपचारिकपणे ताबाही घेतला. मात्र प्रशासनाने त्या दालनाला त्वरित सील ठोकून सेनेचा दालन मिळविण्याचा प्रयत्न हाणून पाडला. विरोधी पक्ष नेता पदावरील नियुक्तीसह दालनाच्या अस्तित्वाच्या भाजपा संकटापुढे सेनेच्या आक्रमकतेचा पारा ढासळू लागल्याचे लक्षात येताच सत्ताधाऱ्यांनी ऐन शिवजयंतीच्या दिवशी सेनेला झटका दिला. दुसऱ्या मजल्यावरील विरोधी पक्ष नेत्याचे दालन लगतच्याच स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील यांच्या दालनात विलिन केले. या दोन्ही दालनाच्या दरम्यान असलेले पार्टीशन तोडून त्याच्या नुतनीकरणाला प्रशासनाच्या माध्यमातून दुरुस्तीला देखील सुरुवात करण्यात आली. त्याचे वृत्त लोकमतने २० फेब्रुवारीच्या हॅलो ठाणे पुरवणीत प्रसिद्ध केले होते. त्यामुळे सेनेने २१ फ्रब्रुवारीच्या महासभेत विरोधी पक्ष नेता पदावरील नियुक्तीसह दालनाचा तोडगा काढण्याचे निश्चित केले. त्यानुसार सेनेच्या सदस्यांनी महापौरांकडे त्या पदावरील नियुक्तीच्या मागणीचा रेटा लावताच महापौरांनी देखील ते आणखी ताणून न धरता भोईर यांची विरोधी पक्ष नेतेपदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले. मात्र दालनाचा प्रश्न उपस्थित होताच आयुक्तांनी तळमजल्याऐवजी पहिल्या मजल्यावर दालन उपलब्ध करुन देण्याचे मान्य केले. यावर सेनेने सुद्धा नमते घेत पहिल्या मजल्यावरील दालनाला पसंती दिली. या दालनाची व्यवस्था पहिल्या मजल्यावरील जाहिरात अथवा किटकजन्य रोग नियंत्रण विभागात होण्याची शक्यता पालिकेच्या सुत्रांकडून वर्तविली जात आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे