लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेच्यावतीने खासगी कार्यालये, औद्योगिक आस्थापना व गृह संकुले यांच्यासाठी निश्चित केलेल्या लसीकरण धोरणांतर्गत महापालिकेने ठाणे शहरातील जवळपास ८५ रूग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु त्यांना दोनच दिवसात स्थगिती देण्यात आली होती. परंतु आता या रुग्णालयांचा पुन्हा सर्वे झाला असून त्यातील ७२ रुग्णालयांना आता लसीकरणाचा परवानगी देण्यात आल्याची माहिती भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दिली.
लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि या मोहीमेत सुसुत्रता आणण्यासाठी ठाणो महापालिकेने काही दिवसांपूर्वी लसीकरणाचे धोरण जाहीर केले होते. या माध्यमातून महापालिकेने दोन दिवसापूर्वी ८५ खाजगी रुग्णालयांना तशी परवानगी देखील दिली होती. त्यानंतर या रुग्णालयांची यादी त्याच दिवशी सोशल मिडियावर वायरल देखील झाली होती. त्यामुळे नागरीक देखील आपल्याला जवळचे रुग्णालय कसे मिळेल याचा शोध घेत होते. परंतु अवघ्या एका दिवसात पालिकेने या निर्णयाला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली होती. यामध्ये काही ठिकाणी जागा नसतांनाही अशांना परवानगी देण्यात आल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी इमारतीमधील घरात असलेल्या क्लिनीकला देखील परवानगी देण्यात आल्याची बाब विक्रांत चव्हाण यांच्या निदर्शनास आली होती. त्यानुसार त्यांनी आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन परवानग्या कशा चुकीच्या पध्दतीने देण्यात आल्या आहेत, याची माहिती दिली. त्यानंतर लसीकरण केंद्र सुरु करतांना सहाय्यक आयुक्तांच्या माध्यमातून पुन्हा रुग्णालयांना सव्र्हे केला गेला आणि आता ७२ रुग्णलायांना परवानगी देण्यात आल्याची माहिती आमदार केळकर यांनी दिली.
गुरुवारी केळकर यांनी भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांच्या समवेत आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेतली. या भेटीत सध्या ठाण्यातील लसीकरण कसे कासव गतीने सुरु आहे, त्याचा वेग कसा वाढवता येईल, रुग्णालयांना परवानगी द्यावी अशा काही महत्वाच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. त्यानुसारच ७२रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी दिल्याची माहिती आयुक्तांनी दिल्याचे केळकर यांनी स्पष्ट केले.
१०० टक्के नालेसफाई झाल्यावरच बिल अदा कराठाण्यात नालेसफाईच्या नावाखाली दरवर्षी धुळफेक केली जात आहे. त्यामुळे यंदा नालेसफाई योग्य पध्दतीने व्हावी, यासाठी आयुक्तांनी लक्ष घालावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. नालेसफाईच्या माध्यमातून हात की सफाई सुरु असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. नालेसफाई न होता पैसे देता कामा नये, ज्यांच्याकडून कामे न करता बिले दिली गेली तर संबधींतावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. तसेच पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण झाली पाहिजे अशी विनंतीही करण्यात आली.
ग्लोबल हॉस्पीटलमधील ठेकेदाराचा ठेका रद्द कराग्लोबल हॉस्पीटलमधील ठेकेदाराकडून योग्य पध्दतीने काम सुरु नाही, नर्सेसेचा पगार थकविला जात आहे. मिनिमम वेजेस नुसार पगार अदा केले जात नाहीत. कामगारांना वेळेवर पगार मिळत नाही. जेवणाच्या तक्रारी आहेत, रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांची माहिती मिळत नाही. त्यामुळे ठेकेदाराकडून योग्य वेळेत पगार देण्यात यावा. त्यातही मिनिमम वेजेसनुसार पगार दिला जात नसेल तर संबधींत ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणीही करण्यात आल्याचे केळकर यांनी स्पष्ट केले.