शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

अखेर रायलादेवी तलाव सुशोभीकरणाला मुहूर्त सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:25 PM

१० कोटी रुपयांची तरतूद; आचारसंहितेआधी उरकले भूमिपूजन

ठाणे : एमआयडीसी आणि ठाणे महापालिका यांच्यातील हस्तांतरणाच्या प्रक्रियेवरून मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या रायलादेवी तलावाच्या संवर्धनासाठी गेल्या वर्षी मुहूर्त मिळाला होता. मात्र, बजेट न मिळाल्यामुळे तब्बल वर्षभर संवर्धनाचे काम रखडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्याच्या संवर्धनाचे भूमिपूजन करण्यात आले. निविदा आणि बजेटची तरतूद करण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागल्याचा दावा प्रशासनाने केला असून या सर्व कामांसाठी बजेटची तरतूद वाढवून ती १० कोटी रु पये केली आहे.रायलादेवी तलावाचे शुद्धीकरण करण्याबरोबरच आजूबाजूच्या परिसराचादेखील कायापालट या संपूर्ण कामांमध्ये करण्यात येणारअसून आचारसंहितेनंतर या कामाला सुरु वात होण्याची शक्यता असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.मागील वर्षी संवर्धन करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. यासाठी ठाणे महापालिका प्रशसानाने आठ कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवली होती. तलावाच्या संवर्धनाच्या माध्यमातून पाण्याची गुणवत्ता वाढवण्याबरोबरच तलावाच्या पाण्याची गळतीदेखील थांबवण्यात आली होती. विशेष म्हणजे, तलावाचे संवर्धन करताना वेगवेगळ्या प्रजातींचे पक्षी या तलावाभोवती येण्यासाठी तशा प्रकारची सुविधा करण्याचीदेखील घोषणा गेल्या वर्षी करण्यात आली होती. मात्र, ती वर्षभर कागदावरच राहिली असून वर्षभरानंतर आता या कामाला मुहूर्त मिळाला आहे.ही कामे करणारयाअंतर्गत तलावाचा संपूर्ण गाळ काढण्यात येणार आहे. तलावाभोवती टो वॉल बांधण्यात येणार आहे, त्यानंतर पिचिंगसह पाथवेदेखील तयार करण्यात येणार आहे. जॉगिंग ट्रॅक, छोटे अ‍ॅम्पी थिएटर तयार करण्यात येणार असून एकूण १० कोटी या कामासाठी खर्च करण्यात येणार आहे. नऊ महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. आता पाण्याची पातळी जास्त असल्याने गाळ काढणे कठीण असल्याने पाणी कमी झाल्यानंतर गाळ काढण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

टॅग्स :thaneठाणे