उल्हासनगर : उल्हासनगरमधील मध्यवर्ती रूग्णालयाच्या शवगारातील एसी मंगळवारी बंद पडल्याने तेथील बेवारस मृतदेहांच्या दुर्गंधीने परिसरातील नागरिक हैराण झाले होते. त्याचे वृत्त गुरूवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द होताच त्याची दखल महापालिकेच्या आरोग्य विभागाचे डॉ. राजा रजिवाणी यांनी घेतली. त्यांनी त्वरित शवगारातील आठ ते १० दिवसांपूर्वी बेवारस ठेवलेले मृतदेह पोलिसांकडून पालिकेच्या ताब्यात घेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, गुरूवारीही शवगारातील एसीची दुरूस्ती झालेली नव्हती.मंगळवारी सायंकाळी अचानक एसी बंद पडल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना सहन करावा लागला. जोपर्यंत पोलिसांकडून एनओसी मिळत नाही तोवर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करता येत नाहीत, असेही स्पष्ट केले. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच पालिका अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली.बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याने शवागारमधील एसीची दुरूस्ती करता येणे शक्य आहे. मात्र येणारे मृतदेह शवागारात ठेवण्यासाठी याठिकाणी बर्फाची सोय रूग्णालयाने केली आहे.
अखेर ‘त्या’ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 4:34 AM