ठाणे : शीळ - डायघर येथील बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण उधळणा-या आठ मनसे पदाधिका-यांना अखेर मंगळवारी प्रत्येकी १५ हजारांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर झाला. त्यामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणाला विरोध करणाºया मनसे पदाधिकाºयांच्या जामीन अर्जावर सोमवारी होणारी सुनावणी एक दिवस पुढे ढकलण्यात आली होती. अखेर मंगळवारी ती होऊन त्यांना न्यायालयाने अटी, शर्तींवर जामीन मंजूर केला.या पदाधिकाºयांनी ७ मे रोजी बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण उधळले होते. सर्वेक्षणाविरोधात आक्रमक भूमिका घेऊन त्यांनी मोजणीच्या मशीन्सदेखील फेकून दिल्या होत्या. या प्रकरणात रवींद्र मोरे, संदीप पाचंगे, पुष्कर विचारे, सागर जेधे, विनायक रणपिसे, जनार्दन खरीवले, शरद पाटील, कुशाल पाटील या जणांना शीळ डायघर पोलिसांनी ८ मे रोजी अटक केली होती. त्यानंतर ९ मे रोजी त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर ११ मेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. ११ मे रोजी त्यांना पुन्हा कोर्टात हजर केल्यावर कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर मंगळवारी सुनावणी होऊन त्यांची अटी व शर्तींसह प्रत्येकी १५ हजारांच्या जात मुचलक्यावर सुटका झाली. न्यायालयाने घातलेल्या अटींमध्ये कुठल्याही पुराव्यात अडथळा निर्माण करू नये, पोलीस तापासात सहकार्य करावे, खटला सुरू झाल्यावर पुढील तारखांना नियमित हजर राहावे या अटींवर त्यांना जामीन देण्यात आले असल्याचे अॅड. ओम्कार राजुकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यामुळे लवकरच त्यांची सुटका होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.>आमच्या पदाधिकाºयांची सुटका झालेली आहे त्यामुळे याचा आनंद आहे. बुलेट ट्रेन विरोधी आंदोलन आता आणखी जोशात करणार आहे.- अविनाश जाधव, अध्यक्ष,ठाणे - पालघर जिल्हा
अखेर ‘त्या’ आठ मनसेच्या पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 6:02 AM