शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अखेर पालिकेला मिळाला विरोधी पक्षनेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:43 AM

मीरा-भार्इंदर महापालिकेतील बहुप्रतीक्षेत विरोधी पक्षनेत्याची घोषणा मंगळवारच्या महासभेत महापौर डिंपल मेहता यांनी केल्याने शिवसेनेने सुटकेचा निश्वास टाकला

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेतील बहुप्रतीक्षेत विरोधी पक्षनेत्याची घोषणा मंगळवारच्या महासभेत महापौर डिंपल मेहता यांनी केल्याने शिवसेनेने सुटकेचा निश्वास टाकला. राजू भोईर यांच्या गळ््यात नेतेपद पडले असले तरी दालनावरून मात्र प्रशासनाने बोळवण केली आहे. दुसºया ऐवजी पहिल्या मजल्यावर दालन देण्याचे आयुक्त बी.जी.पवार यांनी सांगितले.शिवसेनेच्या पदरी विरोधी पक्षनेते पद आले असले तरी आमदार नरेंद्र मेहता यांच्या निर्देशानुसार ते रोखून धरले होते. या पदावर सेनेचे भोईर हे दावेदार ठरल्याने त्यांना या पदापासून वंचितच ठेवावे, असा प्रयत्न भाजपाने वेळोवेळी केला. यामागे भोईर यांच्या जमीन संपादनाचा मुद्दा असल्याचे सांगितले जात असले तरी भोईर यांना त्यावर विराजमान न करण्याचा डाव भाजापाकडून खेळला जात होता.भाजपाने लटकत ठेवलेल्या या पदावरील नियुक्तीचा मुद्दा सेनेने प्रतिष्ठेचा करून अनेकदा आंदोलन छेडले. परंतु, त्यात सेनेची आक्रमकता दिसून येत नसल्याने भाजपाने त्यांची सतत बोळवण सुरू ठेवली.त्यातच या नेत्याचे दालन सुरूवातीपासून पालिका मुख्यालयातील दुसºया मजल्यावर असताना ते थेट तळमजल्यावर नेण्याची योजना सत्ताधाºयांनी आखली. त्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होताच जागी झालेल्या सेनेने त्या नेत्याचे दालन दुसºया मजल्यावरच ठेवावे, असा अट्टाहास सुरू केला. त्यासाठी देखील सेनेने सतत आंदोलन करून ते दालन खुले करुन त्याचा अनौपचारिकपणे ताबाही घेतला. मात्र प्रशासनाने त्या दालनाला सील ठोकून सेनेचा दालन मिळवण्याचा प्रयत्न हाणून पाडला.सेनेच्या आक्रमकतेचा पारा चढत असल्याचे लक्षात येताच सत्ताधाºयांनी ऐन शिवजयंतीच्या दिवशी सेनेला झटका दिला. दुसºया मजल्यावरील विरोधी पक्षनेत्याचे दालन स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील यांच्या दालनात विलीन केले.या दोन्ही दालनाच्या दरम्यान असलेले पार्टीशन तोडून त्याच्या नूतनीकरणाला सुरूवात करण्यात आली. त्याचे वृत्त ‘लोकमत’ने २० फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध केले. त्यामुळे सेनेने मंगळवारच्या महासभेत विरोधी पक्षनेता पदावरील नियुक्तीसह दालनाचा तोडगा काढण्याचे निश्चित केले.त्यानुसार सेनेच्या सदस्यांनी महापौरांकडे त्या पदावरील नियुक्तीच्या मागणीचा रेटा लावताच महापौरांनीही ते आणखी ताणून न धरता भोईर यांच्या नावाची घोषणा केली. यामुळे सेनेने सुटकेचा निश्वास टाकला.