शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अखेर मीरा भाईंदरकरांचे स्वप्न साकार; मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी उद्धाटनाचा बेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2022 6:37 PM

शहराच्या पहिल्या नाट्यगृहाचे काम पूर्ण, तळ अधिक ४ मजल्याच्या इमारतीत १ हजार आसनी व ३०० आसनी अशी २ नाट्यगृह आहेत

मीरारोड - मीरा भाईंदर शहरातील नाट्य रसिकांचे गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न अखेर लवकरच साकार होणार आहे . शहरातील पहिल्या नाट्यगृहाचे काम जवळपास पूर्ण झाले असून मुख्ययमंत्री यांच्या वाढदिवशी म्हणजेच २७ जुलै रोजी नाट्यगृहाच्या उदघाटनाची घंटा वाजण्याची शक्यता आहे . 

मीरा भाईंदर शहर झपाट्याने वाढत असले तरी शहरात एकही नाट्यगृह नाही . मीरारोडच्या शिवार उद्यान येथील मध्यवर्ती भागात नाट्यगृहासाठी असलेल्या एकमेव आरक्षणाला विकासकाच्या घश्यात घालण्याचा प्रताप काही राजकारणी नगरसेवक व प्रशासनाने केल्याने १९९५ साली आरक्षण पडून देखील त्या जागी २७ वर्षांनी देखील  आरक्षणाची जागा पालिका घेऊ शकलेली नाही .  

परंतु शहरातल्या कलासक्त नागरिकांची नाट्यगृहाची गरज पाहता आमदार प्रताप सरनाईक यांनी काशीमीरा महामार्गा लगत असलेल्या सुमारे ५ हजार २५५ चौमी. च्या सुविधा भूखंडावर नाट्यगृह उभारण्याची मागणी करत त्याला मंजुरी मिळवून घेतली होती . त्या नंतर सदर नाट्यगृहाच्या बांधकामा साठी महापालिकेच्या निधीवर अवलंबून न राहता टीडीआर च्या माध्यमातून विकासका कडून सदर इमारतीचे बांधकाम करून घेण्यात आले . इमारतीचे बांधकाम झाले पण अंतर्गत फर्निचर , सजावट आदींवर होणारा खर्च सुद्धा शासना कडून मान्यता घेऊन विकासका कडूनच टीडीआरच्या माध्यमातून करून घेण्यात आला आहे . त्यामुळे महापालिकेचा करोडोंचा निधी वाचला आहे . 

तळ अधिक ४ मजल्याच्या इमारतीत १ हजार आसनी व ३०० आसनी अशी २ नाट्यगृह आहेत. नाट्यगृहाचे संपूर्ण बांधकाम हे १ लाख १० हजार फुटांचे आहे.  तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर आर्ट गॅलरी तर बेसमेंट मध्ये व तळमजल्यावर पार्किंगची सुविधा आहे.  वेटिंग हॉल , कॅफेटेरिया , व्हीआयपी रूम , ग्रीन रूम अशा सुविधा असून ६ लिफ्ट नाट्यगृहात आहेत. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या नाट्यगृहाची ध्वनी यंत्रणा आधुनिक पद्धतीची असून मुंबईतील मोठ्या कंपनीने साउंड सिस्टीम , प्रकाश व्यवस्था केली आहे.  तारांकित हॉटेल सारख्या सुविधा ह्या मध्ये असून मीरा भाईंदर सह दहिसर ते विरारपर्यंतच्या नाट्य रसिकांसाठी हे नाट्यगृह पर्वणी ठरणार आहे . 

गुरुवारी ह्या नाट्यगृह इमारतीची पाहणी आ . सरनाईकी यांच्या सह पालिका आयुक्त दिलीप ढोले आदींनी केली . या वेळी नाट्यगृहाचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसा दिनी म्हणजेच २७ जुलै रोजी करण्यावर चर्चा झाली . कारण ह्या नाट्यगृहाचे भूमिपूजन २३ ऑगस्ट २०१५ रोजी उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच झाले होते. 

सुमारे १५० कोटींचा खर्च ह्या नाट्यगृह इमारतीसाठी झाला आहे . रंगमंच आता नाट्य प्रयोगांसाठी सज्ज झाले आहे . नाट्यकलावंत , नाट्य क्षेत्रातील अनुभवींनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली आहे . शहराला आकर्षक , सुसज्ज नाट्यगृह इमारत मिळाली असून जनतेचे स्वप्न पूर्णत्वास आणू शकलो याचा आनंद मोठा आहे. शासनाने टीडीआरच्या माध्यमातून  खर्च करण्यास मंजुरी दिल्याने पालिकेचा पैसा वाचला आहे. - प्रताप सरनाईक (आमदार)