ठाणे : विजयश्री प्राप्त करूनही सत्तासंघर्षाच्या वादात नेमकाच आमदारपदाचा शपथविधी महिनाभरापासून रखडला होता. त्यामुळे येत असलेल्या समस्या व अडथळे जनताजनार्दनानं निवडलं... आमदार परी नाही या मथळ्याखालील वृत्तात लोकमतने २१ नोव्हेंबरला उघड केले. त्यास अनुसरून अखेर प्राधान्यक्र माने बुधवारी राज्यातील २८६ विजयी उमेदवारांसह ठाणे, पालघर जिल्ह्यांतील २४ जणांच्या आमदारकीचा शपथविधी पार पडला आणि गंगेत घोडे न्हाले... हुश्श:! झाले एकदाचे आमदार आणि सत्ता स्थापनेचा पेचही दूर अशी एकच चर्चा दिवसभर जिल्ह्यात ऐकायला मिळाली. यामुळे प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.सर्वोच्च न्यायालयानेही विजयी उमेदवारांना सर्वप्रथम आमदारपदाची शपथ विधानसभा सभागृहात प्रथम प्राधान्याने घेण्याचे आदेश जारी केले आणि त्यानुसार सर्वांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देऊन आमदारकी आज बहाल केल्याने गेल्या एक महिन्यापासून आमदार या लोकप्रतिनिधीत्वाचा पेचही दूर झाला. आता या नवनिर्वाचित आमदारांना राजशिष्टाचाराचा सलामही प्रशासनाला प्राधान्यक्र माने घालावाच लागेल. आमदारांच्या हक्काची व सन्मानाची पायमल्ली होणार नाही, यांची काटेकोरपणे दक्षता घेऊन त्यांच्या सूचनांची आणि मार्गदर्शनांची अंमलबजावणीदेखील करावीच लागेल, यात आता दुमत नाही.निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा पेच निर्माण झाला आणि या सत्तासंघर्षात १३ व्या विधानसभेच्या सभागृहाची मुदत संपून ते बरखास्त झाले. राज्यपालांच्या निमंत्रणानंतर एकाही पक्षाला बहुमत सिद्ध करता आले नाही. यामुळे १४ व्या विधानसभेच्या सदस्यत्वाची एकाही आमदारास शपथ घेता आली नाही. यामुळे राष्ट्रपती शासनही लागू झाले. या राजवटीत शपथेअभावी विजयी उमेदवारास प्रशासनाच्या आमदारकीच्या राजशिष्टाचारापासून वंचित राहावे लागले. त्यांना द्याव्या लागणाऱ्या शासकीय कार्यक्र मांच्या निमंत्रणाची सक्ती प्रशासनावर नव्हती. तब्बल आजपर्यंतच्या एक महिन्याच्या कालावधीनंतर विजयी उमेदवारांना वन बाय वन शपथ घेण्याची संधी मिळाली.
हुश्श: ... आमदार तर झाले एकदाचे ! प्रशासनाचा सुटकेचा नि:श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 1:32 AM