शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

अखेर खड्डे बुजविण्याच्या मोहीमेला सुरवात

By अजित मांडके | Published: July 16, 2024 3:14 PM

सार्वजनिक बांधकाम आणि मेट्रोच्या मदतीला धावली ठाणे महापालिका

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील कापुरबावडी, माजिवडा, नितीन कंपनी, तिनहात नाका, घोडबंदर भागात रस्त्यांवर पडलेल्या खड्यांचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर अखेर सर्व प्राधिकरण खडबडून जागे झाले आहे. त्यानुसार सोमवार पासून खड्डे बुजविण्याची मोहीम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतली आहे. तिकडे घोडबंदर भागातील खड्डे बुजविण्यासही सुरवात झाली. ठाणे महापालिका देखील या प्राधिकरणांच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पुढे आली आहे. त्यामुळे आता कापुरबावडी, माजिवडा उड्डाणपुलावरील खड्डे बुजविण्यात आल्याचे दिसत आहे.

मुंबई-नाशिक महामार्ग असेल किंवा घोडबंदर रोड असेल या सर्वच रस्त्यांवर खड्डेच खड्डे असे चित्र निर्माण झाले आहे. घोडबंदर भागात मेट्रोचे काम सुरु आहे. तसेच नव्याने येथील रस्त्यांच्या मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु यामुळे वाहतुक कोंडी आणि ठिकठिकाणी रस्त्यांना खड्डे पडल्याचे चित्र आहे. तर कापुरबावडी, माजिवडा या उड्डाणपुलांवर देखील खड्डेच खड्डे असे चित्र निर्माण झाले होते. या पुलावरील खड्डात दुचाकीस्वार पडू शकतात एवढ्या मोठ्या आकाराचे खड्डे होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने हे खड्डे बुजविले होते. परंतु पाऊस झाला आणि पुन्हा खड्डे उखडल्याचे दिसून आले.  खड्ड्यांमुळे वाहतूकीचा वेग मंदावून कोंडी होत होती. तसेच या खड्ड्यांमुळे अपघातांची भिती व्यक्त होत होती. या संदर्भात लोकमतमध्ये वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर संबधींत प्राधिकरणाने पावसाने उसंत घेतल्यावर खड्डे बुजविले जातील असे आश्वासन दिले होते. तर मनसे देखील सोमवारी सांयकाळी घोडबंदर भागातील रस्त्यांवर पडलेल्या खड्यांच्या विरोधात आंदोलन केले होते.

अखेर सोमवारी सांयकाळ पासून कापुरबावडी, माजिवडा आदींसह इतर ठिकाणी रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे. खड्डे बुजविण्याच्या या मोहीमेत ठाणे महापालिका देखील सहभागी झाल्याचे दिसून आले आहे.

तिकडे घोडबंदर भागातील खड्डे बुजविण्यासाठी मेट्रोने या पट्यात आता मास्टीकचा प्लान्ट उभारला असून त्याच्या माध्यमातून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याची मोहीम सुरु केली आहे. याठिकाणी देखील महापालिका त्यांच्या मदतीली धावल्याचे दिसत आहे. त्यानुसार पुढील दोन ते तीन दिवसात घोडबंदर भागातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविले जातील असा दावा प्राधिकरणाकडून करण्यात आला आहे.

महापालिकेला खर्च मिळणार आहे.ठाणे महापालिका दरवर्षी इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवित आहे. मागील तीन ते चार वर्षापासून ही मोहीम सुरु आहे. परंतु यासाठी झालेला खर्च सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा एमएमआरडीए असेल त्यांच्याकडून अद्यापही खड्डे बुजविण्याचा खर्च मिळू शकलेला नाही. त्यामुळे यंदा महापालिकेने पुढाकार घेतला असला तरी देखील तो खर्च मिळणार का? या बाबत शंका निर्माण केली जात आहे.

टॅग्स :Potholeखड्डे