शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

अखेर उल्हासनगरातील बांधकामे नियमाधीन करण्याची अधिसूचना प्रसिद्ध, नागरिकांना दिलासा

By सदानंद नाईक | Published: February 18, 2023 2:44 PM

Ulhasnagar : उल्हासनगर शहरातील अनधिकृत बांधकामे नियमाधीन करण्याची अधीसूचना शुक्रवारी प्रसिद्ध झाली असून २२०० प्रती चौ.मी दराने प्रशमन शुल्क आकारण्यात येणार आहे.

- सदानंद नाईक उल्हासनगर : शहरातील अनधिकृत बांधकामे नियमाधीन करण्याची अधीसूचना शुक्रवारी प्रसिद्ध झाली असून २२०० प्रती चौ.मी दराने प्रशमन शुल्क आकारण्यात येणार आहे. बांधकामे नियमाधीन करण्याची अधिसूचना प्रसिद्ध होताच आमदार कुमार आयलानी यांच्यासह अन्य पक्षाच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला.

उल्हासनगरातील अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर विस्थापिताचे शहर म्हणून खास उल्हासनगरसाठी अवैध बांधकामे नियमित करण्याचा अध्यादेश सन-२००६ साली तत्कालीन राज्य शासनाने प्रसिद्ध केला. महापालिकेने अध्यादेशानुसार सरसगट सव्वा लाख मालमत्ताना नोटीसी पाठवून बांधकामे नियमित करण्याचे आवाहन केले. २२ हजार पेक्षा जास्त नागरिकांनी महापालिका तज्ञ समितीकडे प्रस्ताव सादर केले. मात्र काही तांत्रिक अडचणी व आकारला जाणारा दंड जास्त असल्याने, गेल्या १७ वर्षात फक्त सव्वाशे बांधकामे नियमित झाली. तर हजारो प्रस्ताव आजही धूळ खात पडले आहेत. दरम्यानच्या काळात धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर अवैध बांधकामे नियमाधीन व धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी करण्याची मागणी झाली. तेंव्हा शासनाने काही नियम शिथिल करून जिल्हाधिकारी ऐवजी महापालिका आयुक्तांना सर्वाधिकार दिले. तसेच बांधकामे नियमाधीन करण्याचे हजारो अर्ज ऑनलाइनद्वारे महापालिकेकडे आले आहे.

शहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर तत्कालीन नगरविकासमंत्री व आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ जुलै २०२१ साली एका समितीची स्थापना केली. समितीने २१ एप्रिल २०२२ रोजी अहवाल एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्यावर अहवालाच्या शिफारशीला मान्यता दिली असून आज त्याबाबत शुक्रवारी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. अनधिकृत विकास कामे नियमाधीन करून त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी, महापालिका अनधिकृत बांधकामांना नोटिसा देणार आहे. नोटिसानंतर ९० दिवसात महापालिकेकडे बांधकामे नियमाधीन करण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. अर्जात आवश्यक त्या बाबीची पूर्तता केली असेल आणि प्रशासन शुल्क व विकास आकार दिला असेल व त्याबाबत पदनिर्देशित प्राधिकार्याची खात्री पटली असेलतर, तो अधिकारी अनधिकृत विकास काम नियमाधीन करण्यासाठी त्या व्यक्तीला आपल्या सहीने व कार्यालयाची मोहर उमटून नमुना -ड मध्ये बांधकामे नियमित झाल्याचे प्रमाणपत्र देणार आहे. 

दंड कमी असल्याने नागरिकांत उत्साह अनाधिकृत बांधकामे नियमाधीन करण्याचा दंड २२०० रुपये प्रती चौ.मी. असल्याने व तांत्रिक अडचणी कमी केल्याने क्लस्टरद्वारे बांधकामे नियमाधीन करण्यासाठी नागरिक पुढे सरसावणार आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर