भिवंडी - भिवंडीतील स्व. मीनाताई ठाकरे रंगायतनाच्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त मिळाला असून गुरुवारी रंगायतनाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे.भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौघुले यांनी श्रीफळ वाढवून दुरुस्ती कामाला सुरुवात केली आहे.रंगायतन दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने कलाप्रेमींसह नागरिकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भिवंडी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी १९९६ मध्ये स्व मीनाताई ठाकरे हे भलेमोठे नाट्यगृह बनविण्यात आले आहे.मात्र या नाट्यगृहाची नादुरुस्ती झाल्याने मागील अनेक वर्षांपासून हे नाट्यगृह बंद होते. या नाट्यगृहाच्या दुरावस्थेच्या संदर्भात दैनिक लोकमतसह अन्य वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसारित झाल्या होत्या या बातम्यांची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असतांना या नाट्यगृहाच्या दुरिस्तिसाठी दहा कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र ही निधी व कंत्राटदार मिळण्याच्या प्रक्रियेत वेळ गेल्याने निधी मंजूर होऊनही अनेक वर्षे नाट्यगृ दुरुस्तीअभावी बंदच होते.
अखेर गुरुवारी या नाट्यगृहाच्या दुरुस्तीच्या कामांना प्रत्येक्षात सुरुवात झाली असल्याने नाट्य रासिकांसह कला प्रेमींमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे.