शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

अखेर तिसऱ्या प्रयत्नात रोहन आयएएस झाला

By admin | Published: June 02, 2017 5:35 AM

भारतीय प्रशासकीय सेवेत येण्याची जिद्द बाळगलेल्या रोहन आगवणे याने आयएएस होण्याचे स्वप्न बाळगले. तो यापूर्वी दोन वेळा

 जितेंद्र कालेकर/लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भारतीय प्रशासकीय सेवेत येण्याची जिद्द बाळगलेल्या रोहन आगवणे याने आयएएस होण्याचे स्वप्न बाळगले. तो यापूर्वी दोन वेळा उत्तीर्णही झाला. गेल्या वर्षी ७३५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन आयपीएससाठी निवड झाली. याच प्रशिक्षणादरम्यान जिद्दीने पुन्हा त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि तिसऱ्या प्रयत्नात देशात ५८२ क्रमांक मिळवून अखेर त्याची भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) निवड झाली.इतरांपेक्षा रोहनच्या जिद्दीचा प्रवास काहीसा वेगळा आहे. वडील राज्य शासनाच्या सेवेत सार्वजनिक बांधकाम विभागात अधीक्षक अभियंता. त्यामुळे घरात तशा सर्व सुखसुविधा. रोहनने ठाण्याच्या श्री माँ विद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर आयआयटी मुंबईतून बीटेक पदवी घेतली. पुढे आयआयएम अहमदाबादमधून एमबीए पूर्ण केले. एमबीए पूर्ण करतानाच त्याने आयएएस होण्याचे स्वप्न बाळगले. कोणताही क्लास न लावता स्वयंअध्ययनावर भर दिला. २०१५ मध्ये पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याला आर्म फोर्स हेडक्वार्टरमध्ये निवड झाली. पण, ध्येय पूर्ण न झाल्याने पुन्हा २०१६ मध्ये त्याने नव्याने अभ्यास करून ही परीक्षा दिली. त्या वेळी तो देशात ७३५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन भारतीय पोलीस सेवेसाठी (आयपीएस) त्याची निवड झाली. या वेळी ध्येय गाठता आले नसले, तरी आयपीएसचे प्रशिक्षण घेत असतानाच त्याने पुन्हा २०१७ च्या यूपीएससीची तयारी केली. यात मात्र त्याला यश आले आणि ५८२ क्रमांकाने उत्तीर्ण होऊन आयएएससाठी त्याची निवड झाली. आईवडिलांकडून मिळालेली शिस्त आणि चांगल्या संस्कारांचे धडे, स्वत:ची मेहनत, जिद्द यामुळेच या यशाचा पल्ला गाठू शकल्याचे रोहनने ‘लोकमत’ला सांगितले. तरुणांनी पूर्णपणे ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने मेहनत घेऊन वाटचाल केली, तर त्यांची ध्येये निश्चितपणे पूर्ण होऊ शकतात. रोहन सुरुवातीपासूनच कुशाग्र बुद्धीचा अभ्यासू आहे. प्रशासकीय सेवेतून समाजसेवा करण्याची त्याची इच्छा आता पूर्ण झाली. त्याच्या या यशामुळे आम्हा कुटुंबीयांना आनंद आणि समाधान वाटले. -रमेश आगवणे, अधीक्षक अभियंता, मुंबई