शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

वृध्द दाम्पत्याच्या खून प्रकरणात अखेर दाेघांना अटक; चितळसर पाेलिसांनी लावला छडा

By जितेंद्र कालेकर | Published: February 16, 2024 11:56 PM

विशेष म्हणजे हे आराेपीही त्याच इमारतीमध्ये वास्तव्यास हाेते. तरीही ते पाेलिसांना गेल्या दीड महिन्यांपासून गुंगारा देत हाेते.

ठाणे : घोडबंदर येथील मानपाडा भागातील रेंटलच्या इमारतीमधील एका सदनिकेतील समशेर बहादूर सिंह (६८) आणि मिना समशेर सिंह (६५) या वृध्द दाम्पत्यांच्या खून प्रकरणात अखेर २५ आणि २७ वषीर्य दाेन आराेपींना अटक करण्यात िचतळसर पाेलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे हे आराेपीही त्याच इमारतीमध्ये वास्तव्यास हाेते. तरीही ते पाेलिसांना गेल्या दीड महिन्यांपासून गुंगारा देत हाेते.या मीना दाम्पत्याचा ५ जानेवारी २०२४ राेजी त्यांच्या घरातच संशयास्पद मृतदेह आढळले होते. गळा दाबून त्यांची हत्या केल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून उघड झाली हाेती. त्यानुसार याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाला हाेता.समशेर आणि मिना .या दोघांच्याही अंगावर कोणत्याही जखमा आढळल्या नव्हत्या. घरातून सामान देखील चोरीला गेले नव्हते. अंबरनाथमध्ये राहणाºया त्यांच्या मुलाने याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे हत्येचा गुन्हा दाखल झाला हाेता. मानपाडा येथील ठाणे महापालिकेच्या दोस्ती एम्पेरिया या इमारतीतील १४ व्या मजल्यावरील एका सदनिकेत हे दाम्पत्य वास्तव्याला होते. मुलगा सुधीर हा अंबरनाथमध्ये त्याच्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी समशेर हे परिसरातील गृहसंकुलामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. तर त्यांची पत्नी घरातून दूध विक्रीचा व्यवसाय करीत हाेती. सुधीर हा दररोज त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत असे. आई आणि वडिलांचे मोबाईल बंद असल्याने ४ जानेवारी राेजी रात्री ७ वाजताच्या सुमारास आई-वडिलांना ताे भेटण्यासाठी मानपाडा येथील त्यांच्या निवासस्थानी आला. त्यावेळी घराचा अर्धवट दरवाजा उघडा होता. त्यावेळी दाेघांचेही संशयास्पद मृतदेह आढळल्याने सुधीर यांनी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली हाेती.

याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पाेलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पाेलिस निरीक्षक गिरीश गाेडे यांच्या पथकाने हा तपास केला. यामध्ये त्याच इमारतीमधील दाेघांना तब्बल दीड महिन्यांनी गुरुवारी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सखाेल तपास सुरु असल्याने यातील आराेपींची नावे उघ्ड करता येणार नसल्याचे पाेलिसांनी सांगितले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस