शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

 अखेर उल्हासनगर महापालिकेला आली जाग; रात्री उशिरा फटाके फोडणाऱ्या ४९ जणांवर गुन्हे

By सदानंद नाईक | Published: November 15, 2023 6:38 PM

दिवाळी सणादरम्यान हवेची गुणवत्ता रेड झोन मध्ये गेल्यानंतर, महापालिका व पोलीस प्रशासनाला जाग आली.

उल्हासनगर : दिवाळी सणादरम्यान हवेची गुणवत्ता रेड झोन मध्ये गेल्यानंतर, महापालिका व पोलीस प्रशासनाला जाग आली. मंगळवारी रात्री उशिरा पर्यंत फटाके फोडणार्या ४९ जणांवर महापालिका व पोलीस प्रशासनाने एकत्र येत कारवाई केली. उल्हासनगरात मध्यरात्री पर्यंत फटाक्यांची आतिषबाजी होऊन हवेची पातळी अत्यंत धोकादायक झाली. यामुळे सर्वस्तरातून महापालिका व पोलीस प्रशासनावर टीका झाली. आयुक्त अजीज शेख यांनी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त सुभाष जाधव, अग्निशमन विभाग प्रमुख बाळू नेटके, प्रभाग अधिकारी गणेश शिंपी, जेठानंद करमचंदानी, अनिल खतुरानी, दत्तात्रय जाधव व पर्यावरण विभाग प्रमुख विशाखा सावंत आदी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पोलिसांच्या मदतीने कारवाईचे आदेश दिले. मंगळवारी रात्री १० वाजेनंत्तर फटाके फोडणाऱ्या नागरिकांविरुद्ध महापालिका व पोलीस विभागामार्फत संयुक्त कारवाई करण्यात आली. तब्बल ४९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिले आहे. 

शहरातील सर्व नागरिकांनी पर्यावरण संरक्षणासाठी नियमाचे पालन करावे व पर्यावरणपूरक दिपावली साजरी करावी, असे आवाहन आयुक्त अजीज शेख यांनी केले. याचबरोबर बांधकामातून व डेब्रिस वाहतुकीतून होणारी धूळ कमी करण्यासाठी शहरात सुरु असलेल्या एकुण १९० बांधकामांना नगररचना कार्यालयांमार्फत नोटीस बजावण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या बांधकामांना स्थगिती देण्यात येणार असल्याचे संकेत आयुक्तांनी दिले. मुख्य अग्निशमन अधिकारी व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी फटाक्याच्या दुकानाची पाहणी केली. प्रत्यक्षात फटाक्याच्या दुकानात फटाक्यांचा मोठ्या प्रमाणात साठा केला असून मध्यरात्री पर्यंत फटाक्यांची दुकाने सुरू असल्याचे चित्र शहरात आहे.

फटाक्यांचा टेम्पो व दुकानावर गुन्हा नाही शहरातील कॅम्प नं-३, कामगार रुग्णालय समोरील रहिवासी क्षेत्रातील नागरिकांनी दिवाळीच्या मध्यरात्री ३ वाजता एक फटाक्यांचा टेम्पो अग्निशमन विभागाला पकडून दिला. अग्निशमन विभागाने फटाक्यांचे गोदाम सील करून टेम्पो जप्त केला. मात्र ४ दिवसानंतरही फटाक्यांचा टेम्पो व गोदाम मालकावर गुन्हा दाखल झाला नाही. अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी गुरवारी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर