हितेन नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : कोरोना संसर्ग प्रादुर्भावाच्या तोंडावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना जीवावर उदार होऊन इच्छित स्थळी पोचविणाºया जिल्ह्यातील २ हजार ७८८ एसटी कर्मचाºयांचा पगार देण्यात शासन पातळीवरून कुचराई केली जात असल्याने त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. पगार देण्याबाबत सरकारने तत्काळ धोरण आखण्याची मागणी कर्मचारी वर्गातून केली जात आहे.सर्वसामान्य प्रवाशांची जीवनरेखा म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केलेली एसटी सेवा आणि ते चालविणारे चालक, वाहक, तंत्रज्ञ आदी वर्ग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संकटात सापडला आहे. कोरोनाच्या संकटामुळे एसटी सेवेवर परिणाम झाल्यानंतर एसटी विभागाच्या फेºयांवर मोठा परिणाम झाला आहे. पालघर एसटी परिवहन विभागांतर्गत पालघर, बोईसर, सफाळे, डहाणू, जव्हार, वसई, अर्नाळा, नालासोपारा असे एकूण ८ आगार असून या आगारातून दररोज एसटी बसच्या ३ हजार ३७४ फेºयांसह १ लाख ४३ हजार किलोमीटर्सचा प्रवास केला जात आहे. यातून पालघर विभागाला सुमारे ४५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असते. पालघर आगारातून ६९२ फेºयांद्वारे दररोज २१ हजार १३८ किलोमीटर्सचा प्रवास पार केला जातो, तर सफाळे आगाराच्या ४२७ फेºयांद्वारे ७ हजार ६७६ किमी, वसई आगाराच्या ३५८ फेºयांद्वारे २० हजार १४५ किमी, अर्नाळा आगाराच्या २९८ फेºयाद्वारे २२ हजार ६५५.४ किमी, डहाणू आगाराच्या ४४५ फेºयांद्वारे १६ हजार ०४०.६ किमी, जव्हार आगाराच्या ४५७ फेºयांद्वारे १९ हजार ६३६.३ किमी, बोईसर आगाराच्या ५५५ फेºयांद्वारे २२ हजार ०३८.२ किमी आणि नालासोपारा आगाराच्या १४६ फेºयांद्वारे १३ हजार ८८७ किमीचा प्रवास पार पाडत एसटीचे चालक आणि वाहक एसटी विभागाला सुमारे ४५ लाखाचे उत्पन्न मिळवून देत आहेत.पालघर विभागात एकूण १ हजार २४१ चालक असून ५११ वाहक, ५०२ तंत्रज्ञ, ५३४ इतर कर्मचारी असा एकूण २ हजार ७८८ कर्मचारीवर्ग कार्यरत आहेत. मार्च महिन्यापासून कोरोनाचा हळूहळू प्रादुर्भाव वाढायला लागल्यानंतर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण राखण्याच्या दृष्टीने गर्दी जमणाºया सरकारी यंत्रणांना बंद करण्याचे आदेश निघाले आणि एसटी, रेल्वे या सरकारी यंत्रणांना सर्वात मोठा फटका बसला आहे. पालघर एसटी विभागाला आज ४० ते ५० कोटी रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागले असून त्याचा थेट फटका कर्मचाºयांच्या कुटुंबाला बसला आहे. मार्च महिन्याचा अर्धा पगार, एप्रिलचा ७५ टक्के, मे अर्धा पगार, जून अजून मिळालेला नाही, तर जुलै महिन्याच्या पगाराची शाश्वती नसल्याने घरखर्च, मुलांच्या शाळेची फी, आजार खर्च, एसटी विभागाकडून घेतलेले कर्ज, बँकांचे कर्ज आदी खर्च सोसून खायचे काय? अशी बिकट परिस्थिती एसटी कर्मचाºयांवर ओढवली आहे. या पगाराबाबत एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाचा हा धोरणात्मक निर्णय असल्याचे वरिष्ठांचे म्हणणे आहे.कोरोना संसर्गाची भीती असतानाही आम्ही कामावर येतोय. त्याचा मोबदला मिळत नाही. काम करूनही पगार मिळत नसल्याने कुटुंबाच्या उदारनिर्वाहासह अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.- चंद्रकांत पाटील, एसटीचालक
एसटी कर्मचाऱ्यांचे पगाराविना आर्थिक गणित कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 1:19 AM