मीरा रोड : ट्रायच्या निर्देशानुसार आकारल्या जाणाऱ्या केबलच्या शुल्कामुळे ग्राहकांना भुर्दंड पडत असल्याचा निषेध काही केबल चालकांसह ग्राहकांनीही केला आहे. पत्रक वाटणे, ग्राहकांना तक्रारीचे आवाहन करणे आदी मार्ग निषेधासाठी अवलंबले आहेत. ३०० ते ३५० रुपयात दिसणारे पाचशेपेक्षा अधिक चॅनलसाठी आता सहाशे ते बाराशे रुपये होत असल्याने ग्राहकांना अनेक चॅनलना मुरड घालावी लागत आहे.‘ट्राय’ ने चॅनलनुसार शुल्क आकारण्यास घेतल्याने आता केबल शुल्कातील सुमारे ८० टक्के रक्कम ही ब्रॉडकास्टर तथा केबल कंपनीला द्यावी लागत आहे. त्यातून लहान लहान केबल आॅपरेटरना जेमतेम १० टक्केच फायदा होत आहे. तुटपुंज्या फायद्यात कर्मचारी, देखभाल, वीज,भाडे आदी परवडत नसल्याचा त्यांचा दावा आहे.
>ग्राहकांची समजूत काढणे अवघड जात आहे. त्यामुळे आधीचे केबल दर व ट्रायमुळे ग्राहकांचे होणारे नुकसान याची जनजागृती पत्रके वाटून करणार आहोत. - सुरेश म्हात्रे,केबल चालक, मीरा रोड