शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

वृक्ष पुनर्रोपित करण्यासाठी जागा शोधा, उच्च न्यायालयाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 6:58 AM

वडाळा ते कासारवडवली या मेट्रो-४ प्रकल्पासाठी मुलुंड चेकनाका ते कासारवडवली या पट्ट्यातील ९०० हून अधिक वृक्ष कापण्यात येणार आहेत.

मुंबई : वडाळा ते कासारवडवली या मेट्रो-४ प्रकल्पासाठी मुलुंड चेकनाका ते कासारवडवली या पट्ट्यातील ९०० हून अधिक वृक्ष कापण्यात येणार आहेत. तर त्यातील काहींचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. मात्र, वृक्ष ज्या ठिकाणाहून हलविण्यात येणार आहेत, त्या ठिकाणाहून ३० कि.मी. आतच त्यांचे पुनर्रोपण करण्यासाठी जागा शोधा आणि दहा दिवसांत अहवाल सादर करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला मंगळवारी दिले.ठाणे महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीने सारासार विचार न करताच मेट्रो ४ प्रकल्पाआड येत असलेल्या काही वृक्षांची कत्तल करण्याचे तर काही वृक्ष पुनर्रोपित करण्यास परवानगी दिली. मुलुंड चेकनाका ते कासारवडवली या पट्ट्यातील बहुतांशी वृक्ष हे गटार, नाले किंवा काँक्रिटच्या रस्त्यावर आहेत. त्यामुळे या वृक्षांचे प्रत्यारोपण करण्याऐवजी नवी रोपटी लावण्यात यावी, अशी सूचना तज्ज्ञांच्या समितीने न्यायालयाला केली. मात्र, न्यायालयाने ठाणे महापालिकेला पुनर्रोपणाचा प्रयोग करू दे, असे म्हटले.या वृक्षांचे पुनर्रोपण ज्या जागेवरून वृक्ष हलविण्यात आले, त्या ठिकाणाहून ३० कि.मी. दूर करण्यात येणार असल्याची बाबही समितीने न्यायालयाच्या निदर्शनास आणली व त्यावर हरकत घेतली. त्यावर न्यायालयाने ठाणे महापालिकेला या झाडांना ज्या ठिकाणाहून हलविण्यात आले, त्या ठिकाणच्या ३० कि.मी. परिसरातच झाडांचे पुनर्रोपण करण्यासाठी जागा शोधण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला दिले आहेत.९00 हून अधिक वृक्षांची होणार कत्तलमेट्रो ४ प्रकल्पातील मुलुंड चेकनाका ते कासारवडवली या पट्ट्यात प्रकल्पाआड येणाऱ्या ९०० हून अधिक वृक्षांची कत्तल होणार आहे. मात्र, तज्ज्ञांच्या समितीने नवी रोपटी लावावी असे सांगितले, पण न्यायालयाने येथील ३० कि.मी. परिसरात झाडांचे पुनर्रोपण करण्यासाठी जागा शोधण्यास सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालय