ठाणे - येथील भाजपाचे नगरसेवक नारायण शंकर पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. निवडणूकीच्या वेळी सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये शिक्षणाची माहिती खोटी दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर फसवणूक (420) चा गुन्हा दाखल करावा असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. याशिवाय भा.दं.वि 406,467,468,469,417,199,200,120(B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
वकील संजय सोनार यांनी 18 मे 2018 रोजी निवडणूक आयोगाकडे याबाबतची तकरार दाखल केली होती. या तक्रारीसोबत त्यांनी ठोस पुरावेही निवडणूक आयोगाला सपुर्द केले होते. त्यानुसार निवडणुक आयोगाने नारायण पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये नारायण पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेब्रुवारी 2017 मध्ये नारायण पवार यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला होता. ठाणे महानगर पालिका प्रभाग क्रमांक 12 पाचपाखाडी परिसरातून नारायण पवार भाजपाच्या तिकीटावर निवडणून आले होते.
नारायण पवार