शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

अग्निशमन एनओसी : ठाण्यातील आणखी १३ हॉटेल झाली सील  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 7:27 AM

सहा महिन्यांपासून वारंवार नोटिसा देऊनही आगप्रतिबंधक उपाययोजना न करणाºया ८६ हॉटेल आणि बारपैकी १३ हॉटेल ऐन रविवारी सील करण्याची कारवाई अग्निशमन दलाने केली. नियमांचे उल्लंघन करणाºया अशा हॉटेलांवर कारवाई करण्याचे आदेश शनिवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीच पालिका प्रशासनाला दिले होते.

ठाणे - सहा महिन्यांपासून वारंवार नोटिसा देऊनही आगप्रतिबंधक उपाययोजना न करणाºया ८६ हॉटेल आणि बारपैकी १३ हॉटेल ऐन रविवारी सील करण्याची कारवाई अग्निशमन दलाने केली. नियमांचे उल्लंघन करणाºया अशा हॉटेलांवर कारवाई करण्याचे आदेश शनिवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीच पालिका प्रशासनाला दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.यापूर्वीही अनधिकृत बार, हॉटेल, हुक्का पार्लरवर पालिकेतर्फे कारवाई करण्यात आली होती. मुंबईतील कमला मिलच्या घटनेनंतर आग प्रतिबंधक यंत्रणेचा मुद्दा चर्चेत आल्याने त्यावर कारवाई सुरू झाली.आगप्रतिबंधक उपाययोजना न केल्याने अग्निशमन दलाने ठाणे शहरातील ४२६ हॉटेल, बार, लाउंज यांना ‘ना-हरकत दाखला’ दिलेला नाही. त्यामुळे त्यांना सप्टेंबर २०१७ पासून फेब्रुवारी २०१८ या कालावधीत ठाणे अग्निशमन दलाने त्यांची पूर्तता करण्यासाठी वारंवार नोटिसा देण्यात आल्या होत्या.मात्र, अनधिकृत इमारतींमध्ये असूनही ज्यांनी आगप्रतिबंधक उपाययोजनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, अशी ८६ हॉटेल, बार, लाउंज तीन दिवसांत सील करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. या आदेशानंतर २४ तासांच्या आतच मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांच्या पथकाने रविवारी हॉटेल टायटॅनिक (कळवा), हॉटेल एव्हरी डे अंडे (नौपाडा), हॉटेल म्युनो (कोठारी कम्पाउंड), हॉटेल ७० डिग्री (कोठारी कम्पाउंड), हॉटेल रेनबो बार (बाळकुम नाका), हॉटेल एक्स झोन (वाघबीळ), हॉटेल गोल्डन फास्ट फूड (कोपरी), हॉटेल लजीज फूड जंक्शन (कोपरी), हॉटेल हादिया, हॉटेल कौसर (कौसा-मुंब्रा), हॉटेल देवीदर्शन (रघुनाथनगर), हॉटेल फुकरे ( फ्लॉवर व्हॅली) आदी १३ हॉटेल सील केली. या कारवाईने हॉटेलमालकांचे चांगलेच धाबे दणाणले असून कारवाई टाळण्यासाठी उरलेल्यांची अजूनही धावपळ सुरू आहे.२६० प्रकरणे शहर विकास विभागाकडेच्जवळपास ८० हॉटेलमालकांनी आपल्या कागदपत्रांची पूर्तता करून हॉटेलमध्ये अग्निशमन यंत्रणा सक्षम असल्याचा दावा केला. त्यानंतर त्यांच्या दाव्याची तपासणी करून घेण्यात आली. ज्यांची यंत्रणा योग्य नव्हती, त्यांच्यावर कारवाई झाली.च्जी हॉटेल अधिकृत इमारतीमध्ये नाहीत, परंतु त्यांनी आगप्रतिबंधक उपाययोजनांच्या नियमांची पूर्तता केली आहे, अशी २६० प्रकरणे शहर विकास विभागाकडे नियमित करण्याच्या कार्यवाहीसाठी सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.अधिकृत आणि अनधिकृत अशा दोन्ही ठिकाणच्या हॉटेलांमध्ये आगप्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत की नाही, याची तपासणी केली जात आहे. अनधिकृत आहेत, पण उपाययोजना करणाºया २६० हॉटेलमालकांना कम्पाउंडिंग दंडआकारणी करून त्यांची हॉटेल नियमित केली जातील. ती प्रकरणे शहर विकास विभागाकडे देण्यात आली आहेत. पण, ज्यांनी कोणत्याच अटींचे पालन केलेले नाही, त्यांना मात्र कोणतीही दया न दाखवता ही कारवाई केली जाणार आहे.- शशिकांत काळे, मुख्य अग्निशमन अधिकारी

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका