उल्हासनगर : कॅम्प नं-२, फर्निचर मार्केटमधील गोल्डी फर्निचर दुकानाला शुक्रवारी सकाळी ९ वा.च्या सुमारास आग लागून लाखांचे फर्निचर खाक झाले. अग्निशमन दलाने काही तासांत आगीवर नियंत्रण मिळविल्याने पहिला व तळमजल्यावरील फर्निचर सुरक्षित असल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी भास्कर मिरपगारे यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-२ परिसरात फर्निचर मार्केट प्रसिद्ध आहे. मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण आदी शहरांसह परिसरातील शेकडो नागरिक घरगुती फर्निचर खरेदी करण्यासाठी शहरात येतात. कोट्यवधींची उलाढाल असलेल्या मार्केटमध्ये पार्किंगसह इतर सुविधा नसल्याने व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. गोल्डी नावाच्या फर्निचर दुकानाच्या दुसºया मजल्यावरून सकाळी ९ वा.च्या दरम्यान धूर निघण्यास सुरुवात झाल्यावर आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. काही वेळात अग्निशमन दलाच्या बंबांनी आग विझविण्याचे काम सुरू केले. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. काही तासांत आगीवर नियंत्रण मिळविल्याने, दुकानाच्या पहिल्या व तळमजल्यावरील फर्निचर काही प्रमाणात सुरक्षित मिळाले. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.गोल्डी फर्निचर दुकानाच्या दुसºया मजल्यावरील लाखो किमतीचे फर्निचर जळून खाक झाले असून पहिल्या व तळमजल्यावरील फर्निचर काही प्रमाणात खराब झाले, असे प्रत्यक्षदर्शी व्यापाऱ्यांनी सांगितले. सकाळी दुकान बंद असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.आमदार कुमार आयलानी यांच्यासह भाजप पदाधिकारी व अन्य पक्षांच्या नेत्यांनी घटनास्थळी धाव घेऊन व्यापाºयांना सतर्क राहण्याचे सांगितले. तसेच गोल्डी दुकानाची पाहणी केली. गजानन व जपानी कपड्यांच्या प्रसिद्ध मार्केटमध्ये आग लागल्यास येजा करण्यासाठी नागरिकांना रस्ता नाही. त्यामुळे भविष्यात येथे काही घडल्यास अनर्थ होऊ शकतो.सुविधा देण्याची मागणीशहरात जीन्स मार्केटसह फर्निचर, गाउन, इलेक्ट्रॉनिक, जपानी व गजानन कपडा मार्केट व बॅग मार्केट प्रसिद्ध असून कोट्यवधींची उलाढाल होते. अशा मार्केटला सुखसुविधा पुरविण्याची जबाबदारी पालिकेची आहे. मात्र, मार्केटला सुविधा पुरवित नसल्याने अनेक व्यापारी व उद्योग शहरातून स्थलांतरित होत आहे.