कल्याण - पश्चिमेतील वाडेघर डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला भीषण आग लागली आहे. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून रात्री ९.३० च्या सुमारास ही आग लागली. खाडी किनाऱ्याच्या बाजूला असणाऱ्या कचऱ्याला आग लागली आणि ती वाऱ्यामुळे जोरात पसरत आहे. स्थानिक नगरसेवक वरुण पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतलीया आगीमुळे डम्पिंग ग्राऊंड शेजारील परिसरावर धुराचे मोठे लोट पसरले असून वाऱ्यामुळे हा धूर सर्वत्र पसरत आहे. दरम्यान आग लागल्याची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग रात्रभर विझण्याची शक्यता नाकारता येत नाही.दरवर्षी उन्हाळ्याला सुरुवात झाली की डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा पेट घेतो. उन्हाळ्यात वारंवार अशा आग लागण्याच्या घटना घडतात. यंदाच्या उन्हाळ्यातील ही पहिलीच आणि तितकीच मोठी आग असल्याचे दिसत आहे.
कल्याणच्या वाडेघर डम्पिंग ग्राऊंडला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 01:25 IST