उल्हासनगर : कॅम्प नं-५, साईबाबा मंदिर येथील एका वाणिज्य वापराच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याला शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीत एका वकिलांचे ऑफीसचे जळून खाक झाले असून महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५, साई बाबा मंदिर परिसरात जेकेआरके नावाची बहुमजली वाणिज्य वापराची इमारत आहे. इमारतीच्या दुसऱ्या माजल्यातून शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजता धूर निघू लागल्याने, नागरिकांनी आग लागल्याची माहिती महापालिका अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी काही तासात आग आटोक्यात आणल्याची माहिती विभागाची प्रमुख बाळू नेटके यांनी दिली. आगीत दुसऱ्या मजल्यावरील हरेश हेमनानी यांच्या कार्यालयाचे लाखोंचे नुकसान झाले असून आग शॉर्ट सर्किटने लागल्याचे संकेत अग्निशमन विभागाच्या जवांनांनी दिली. याप्रकरणी हिललाईन पोलीस अधिक तपास करीत आहेत.