भिवंडी:तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीत वालशिंद येथे असलेल्या अहर्रम लॉजेस्टीक पार्क या गोदाम संकुलाच्या तीन मजली इमारतीस आज शुक्रवार रोजी सायंकाळी साडेचार वाजता लागलेल्या भिषण आगीत कंपनीच्या कार्यालयासह तीन मजली इमारत जळून खाक झाली.तालुक्यातील वालशिंद येथे शेकडो एकर जागेतील अहर्रम लॉजेस्टिक पार्क नावाने गोदाम संकुल असुन त्याच्या प्रवेशद्वारावर या कंपनीचे तीन मजली इमारतीचे मुख्य कार्यालय होते. या कार्यालयाच्या आंत केवळ आरसीसी खांबाला लागून काचेची तावदाने व प्लायवुडने बनविण्यात आली होती. सायंकाळी अचानक इमारतीच्या आतील भागातुन धुर दिसु लागल्याने आतील कर्मचारी बाहेर पळत त्यांनी आगीची माहिती अग्निशामक दलास दिली.आगीच्या भडक्याने काचेची तावदाने तडकून फुटत होती. त्यामुळे आग विझविण्यासाठी भिवंडी व कल्याण येथील अग्निशामक प्रयत्न करीत होते. शॉर्टसर्किटने आग लागल्याचे सांगीतले जात असून या इमारतीततील गोदामे व कार्यालयांतील जमीन व्यवहाराचे कागदपत्रे जळून खाक झाल्याची माहिती मिळते. दोन वर्षापुर्वी या गोदाम संकुलातील एक लाख क्स्वेअर फुटाच्या अनाधिकृत गोदामांवर जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी कारवाई केली होती . त्यामुळे या आगीतुन संशयाचा धुर निघत आहे .दरम्यान आग संपुर्ण नियंत्रणात आल्याची माहिती भिवंडी मनपाच्या अग्निशामक दलाच्या कार्यालयांतून देण्यात आली.
भिवंडीत गोदाम संकुलास आग, तीन मजली इमारत जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 11:24 PM
भिवंडी :तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीत वालशिंद येथे असलेल्या अहर्रम लॉजेस्टीक पार्क या गोदाम संकुलाच्या तीन मजली इमारतीस आज शुक्रवार ...
ठळक मुद्देअहर्रम लॉजेस्टीक पार्क गोदाम संकुलाच्या इमारतीस आगकार्यालयांतील कागदपत्रे जळाल्याने आगीतुन संशयाचा धुरभिवंडी व कल्याण अग्निशामकदलाने विझविली आग