मीरारोड - कोरोनाच्या संसर्गा मुळे सर्व धर्मियांनी धार्मिक स्थळे बंद ठेऊन आणि सण साधेपणाने घरीच साजरे करून आपली जबाबदारी पाळली आहे . दिवाळी सह छटपूजा, ख्रिसमस , न्यू इयर आदी नागरिकांनी साधेपणाने साजरे करून फटाके फोडू नयेत असे आवाहन आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी केले आहे . मोठे आवाज आणि धूर पसरवणारे फटाके सार्वजनिक , खाजगी जागेत फोडू नयेत. रात्री ८ ते १० असे दोन तासच फटाके फोडण्यास परवानगी ल असून अन्य वेळात फटाके फोडल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे .
कोरोनाचा संसर्ग आता काही जाणवत असला तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही . त्यातच दिल्लीत पुन्हा झालेला कोरोनाचा उद्रेक आणि महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आदी पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर मधील नागरिकांनी देखील आपले कर्तव्य - जबाबदारी काटेकोरपणे पाळावी असे आवाहन महापालिके कडून करण्यात आले आहे .
दिवाळीच्या अनुषंगाने आयुक्त डॉ . राठोड यांनी आदेश जरी केले असून दिवाळी मध्ये रात्री ८ ते १० असे दोन तासच फटाके फोडण्यास परवानगी राहणार आहे . छटपूजेला सकाळी ६ ते ८ आणि नाताळ व न्यू इयर ला रात्री ११. ते १२. ३० या वेळेतच फटाके फोडता येणार आहेत . या व्यतिरिक्त अन्य वेळात फटाके फोडल्यास थेट गुन्हा दाखल होणार आहे .
दिवाळी आदी सण देखील साजरे करताना गर्दी करू नये . वृद्ध , लहान मुलं , आजारी व्यक्तींनी बाहेर जाणे टाळावे . दिवाळी निमित्त गर्दी होईल असे कार्यक्रम आयोजित करू नये . ओनलाईन , फेसबुक लाईव्ह वर कार्यक्रम सादर करावेत . आरोग्य शिबीर, जनजागृती पर सामाजिक कार्यक्रम करावेत .
हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, व्यावसायीक आदी ठिकाणी फटाके फोडता येणार नाहीत. आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते. फटाक्यांचा धूर घातक असल्याने कोरोना वा अन्य रुग्णांच्या जीवाला धोका होत असल्याचे आयुक्त डॉ राठोड यांनी म्हटले आहे.