शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

ठामपाचे उत्पन्न २५९ कोटींनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 1:03 AM

करवसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर बॅण्डबाजा वाजवण्यापासून त्यांच्या नळजोडण्या तोडण्यापर्यंत अनेक उपाययोजना महापालिकांनी केल्या आहेत. काही महापालिकांनी करदात्यांकरिता अभय योजना लागू केल्या आहेत. या आर्थिक चित्राचा सविस्तर घेतलेला आढावा...

- अजित मांडके, ठाणेठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिकांच्या क्षेत्रात सध्या मार्चअखेरपर्यंत करवसुलीची लगीनघाई सुरू आहे. उत्पन्नाचे लक्ष्य व प्रत्यक्षात वसुली यातील अंतर काही महापालिकांमध्ये बरेच मोठे आहे. त्याचा परिणाम विकासकामांवर झाला आहे. आगामी आर्थिक वर्षातील तरतुदींवरही या अल्प उत्पन्नाचा परिणाम होणार आहे. करवसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर बॅण्डबाजा वाजवण्यापासून त्यांच्या नळजोडण्या तोडण्यापर्यंत अनेक उपाययोजना महापालिकांनी केल्या आहेत. काही महापालिकांनी करदात्यांकरिता अभय योजना लागू केल्या आहेत. या आर्थिक चित्राचा सविस्तर घेतलेला आढावा...ठाणे महापालिकेच्या विविध विभागांमार्फत आतापर्यंत करवसुलीचे २३०० कोटींचे उद्दिष्ट पार केले आहे. कररचनेत केलेले बदल, शहर विकास विभागाकडे मंजुरीसाठी आलेले नवीन प्रकल्प, विविध सवलतींच्या योजनांमुळे महापालिकेच्या विविध करांत समाधानकारक वाढ झाल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यानुसार, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फेब्रुवारीअखेरपर्यंत पालिकेचे उत्पन्न हे २५९ कोटींनी अधिक असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत पालिकेला विविध करांतून २२९५ कोटी १७ लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. मागील वर्षी फेब्रुवारीअखेरपर्यंत २०३५ कोटी १८ लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले होते.ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली करवसुलीसाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या होत्या. त्यानुसार, करवसुलीत वाढ होत आहे. ज्या करदात्यांनी अद्यापपर्यंत मालमत्ताकर भरलेला नाही, अशा करदात्यांविरुद्ध मालमत्ता अधिनियमातील तरतुदीनुसार प्रभागस्तरावर कडक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच जे थकबाकीदार असतील, त्यांच्या मालमत्ता जप्त करणे, नळजोडण्या खंडित करणे, थकबाकीदारांची नावे फलकावर जाहीर करणे तसेच डिजी सिटीद्वारे आॅनलाइन पेमेंटची सुविधा पालिकेने करदात्यांना उपलब्ध करून दिली आहे. त्यावर कर भरल्यास त्यातही सूट दिली जात आहे. तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी पालिकेची करवसुली कार्यालये सुरू ठेवण्यात आलेली आहेत. याशिवाय, मालमत्ताकरात वाढ करण्यात आल्याने त्याचा परिणाम म्हणून मालमत्ताकराच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. शहर विकास विभागाकडे यंदाच्या आर्थिक वर्षात विविध विकास प्रस्तावांच्या संख्येत वाढ झाल्याने शहर विकास विभागाचेही उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत वाढलेले आहे. पालिकेने आणलेल्या नव्या योजनेंतर्गत जे नागरिक देय असलेला थकीत मालमत्ताकर चालू मागणीसह १ फेब्रुवारी २०२० ते २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत एकरकमी भरतील, अशा करदात्यांना त्यांच्या मालमत्ताकरावरील दंड/व्याजाच्या रकमेमध्ये ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच जे करदाते १ मार्च ते ३१ मार्च २०२० पर्यंत देय होणारा थकीत मालमत्ताकर चालू मागणीसह अधिक प्रशासकीय आकाराच्या ६० टक्के रक्कम एकरकमी भरतील, अशा करदात्यांना त्यांच्या मालमत्ताकरावरील दंड/व्याजाच्या रकमेत ४० टक्के सूट देण्यात येणार आहे. त्यामुळेदेखील पालिकेच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.ठाणे महापालिकेला या आर्थिक वर्षात ३७५० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार, फेब्रुवारीअखेरपर्यंत २२९५ कोटी १७ लाखांची वसुली करण्यात आली आहे. आता उर्वरित २० ते २५ दिवसांत मालमत्ताकर विभागाकडून १०० कोटी, शहर विकास विभाग १०० कोटी, शासनाकडून जीएसटी आणि अनुदानापोटी १२५ कोटी आणि इतर सुमारे ६० कोटींच्या आसपास असे ४५० कोटींच्या आसपास उत्पन्न येणे अपेक्षित आहे. त्यानुसार, उद्दिष्टाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही पालिकेचे म्हणणे आहे.यंदा ३७५० कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असले तरी २७५० कोटींच्या आसपास उत्पन्न मिळेल, असा दावा पालिकेने केला आहे. असे झाल्यास उद्दिष्टापेक्षा १००० कोटींनी उत्पन्न कमी होईल, असेच दिसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत उत्पन्न मात्र १५० ते २०० कोटींनी अधिक असेल, असेही पालिकेचे म्हणणे आहे. 

टॅग्स :tmcठाणे महापालिकाthaneठाणे