शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

पहिलीच महासभा पाण्याने गाजणार

By admin | Published: April 17, 2017 4:48 AM

शहरातील तीव्र पाणीटंचाईवर शिवसेना आक्रमक झाली आहे. पहिल्याच महासभेत पाणीप्रश्नावर सत्ताधाऱ्यांसह पालिका प्रशासनाची कोंडी

उल्हासनगर : शहरातील तीव्र पाणीटंचाईवर शिवसेना आक्रमक झाली आहे. पहिल्याच महासभेत पाणीप्रश्नावर सत्ताधाऱ्यांसह पालिका प्रशासनाची कोंडी करण्याची पूर्ण तयारी केली आहे. नागरिकांना आठवड्यातून दोन ते तीन दिवसच पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, कबरस्तान, रिजन्सी रेसिडन्सीजवळील भूखंड, व्हीटीसी मैदान, डम्पिंग, रस्ते आदी प्रश्नांची प्रश्नावली शिवसेनेने केली आहे. उल्हासनगरातील पाणीटंचाईच्या निषेधार्थ शिवसेना नगरसेवकांनी गेल्या आठवड्यात जिजामाता गार्डनसमोर उपोषण केले होते. आयुक्त सुधाकर शिंदे व महापौर मीना आयलानी यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले होते. मात्र, पाणीपुरवठ्यात काहीही फरक पडला नसल्याची माहिती नगरसेवक अरुण अशान यांनी दिली. २० एप्रिलला महासभा होत असून पाणीप्रश्न महासभेत गाजणार, अशी माहिती शिवसेनाशहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. विरोधी पक्षाची भूमिका काय असते, ते सत्ताधाऱ्यांना दाखवून देणार असल्याचे ते म्हणाले. कॅम्प नं.-४ व ५ परिसरांतील मराठा सेक्शन, जिजामाता गार्डन, ओटी सेक्शन, भीमनगर, मद्रासीपाड्यासह सुभाष टेकडी, संभाजी चौक, सत्यसाई शाळा परिसर, गायकवाडपाडा, कैलास कॉलनी, समतानगर, तानाजीनगर, महादेवनगर, लालचक्की परिसरात पाणीटंचाई सर्वाधिक आहे.आयुक्तांच्या म्हणण्यानुसार दरदिवशी १२९ दशलक्ष लीटरपाणीपुरवठा एमआयडीसीकडून होतो. लोकसंख्येच्या दुप्पट पाणीपुरवठा होऊनही शहरात टंचाई निर्माण झाली. यामागे फसलेली ३०० कोटींची पाणीपुरवठा योजना असून ४० टक्कयांपेक्षा जास्त गळतीचे प्रमाण असल्याचे ते म्हणाले. शहरातील जलवाहिन्या अनेक ठिकाणी फुटल्या असून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. पालिका यावर ठोस कारवाई व उपाययोजना करीत नसल्याची माहिती शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. तर, टप्प्याटप्प्याने जलवाहिन्यांचे सर्वेक्षण करणार असल्याची माहिती आयुक्त शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी)