लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भिवंडी पालिका क्षेत्रात गोवर या आजाराने एका बालकाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ गुरुवारी ठाण्यात गोवरचा पहिला बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. ठाणे पालिका हद्दीतील शीळ येथील पत्रा चाल येथे राहणारी असल्याची माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली.
दिवसेंदिवस ठाणे महापालिका अधिक गोवरच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून पालिका हद्दीतील शीळ डायघर भागात गोवर बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार पालिका प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेत, सर्वेक्षण मोहीम देखील हाती घेतली आहे. या सर्वेक्षण मोहिमेत आतापर्यंत २८ गोवर बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. असे असताना, मंगळवारी शीळ येथील पत्रचाळ भगत राहणाऱ्या एक साडे सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता. त्याचा मृत्यू गोवरने झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.
त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्याचा मृत्यू गोवरने झाला असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. तसेच मृत्यू झालेल्या बालकाचे लसीकरण देखील झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.