ठाणे - ठाणे महापालिकेने एका खाजगी संस्थेच्या मदतीने केलेल्या एका सर्व्हेत, शहरातील ६० टक्के नागरीक हे पायी चालत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळेच आता या पायी चालणाऱ्या पादचाऱ्यासाठी आणि सायकलसाठी सर्व्हीस रोडवर एक वेगळी लेन देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार याचा अभ्यास झाला असून आता शहरातील मुख्य रस्त्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. आता या संदर्भातील प्रकल्पासाठी तब्बल २४ कोटींचा खर्च केला जाणार आहे. त्यानुसार आता सॉफ्ट मोबीलीटीच्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा वागळे भागात आकार घेणार आहे. यासाठी पाच कोटींचा खर्च केला जाणार आहे.शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, रस्त्यांचा आकार मात्र हा तेवढाच आहे. त्यामुळे शहरातील मुख्य जंक्शनवर सकाळ, सांयकाळच्या सुमारास कोंडी होत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी किंबहुना ठाणेकरांनी कमी अंतर कापण्यासाठी आपल्या खाजगी वाहनाचा वापर करण्याऐवजी सायकल अथवा पायी चालून अंतर कापावे या उद्देशाने सॉफ्ट मॉबीलीटीचा महत्वांकाक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात वागळे भागात हा प्रयोग केला जाणार आहे. वागळे मुख्य रस्ता लगच्या सुमारे १० किमी लांबीच्या प्रमुख रस्त्यांचे जाळे गृहीत धरण्यात आले असून त्यानुसार पदपथाची सुधारणा, रेलींग्ज, रंगीत बिटुमेनचा वापर करुन सायकल ट्रॅकचा पाथ, साईनेजेस, थर्मोप्लास्टीक पेंटच्या माध्यमातून लेनिंग, जंक्शनवर पादचाऱ्यासाठी व सायकलस्वारांसाठी झेब्रा क्रॉसींग, पेडस्ट्रीयन आयलँड, प्रस्तावित सायकल डेपो व बस डेपो यांचा संयुक्त विचार करुन त्या प्रमाणे नियोजन आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे या भागातील पादचाºयांना सुरक्षितरित्या पायी चालण्यासाठी व सायकल स्वारांसाठी निश्चित असा स्वतंत्र मार्ग उपलब्ध होणार आहे. यासाठी पाच कोटींचा खर्च केला जाणार आहे.
सॉफ्ट मोबीलीटीचा पहिला प्रयोग वागळे पट्यात, पाच कोटींचा केला जाणार खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 5:36 PM
ठाणेकर पादचाऱ्यासाठी सुरक्षितरित्य चालता यावे या उद्देशाने आता महापालिकेने स्फॉट मोबीलीटीचा पहिला प्रयोग वागळे पट्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देसायकलींग ट्रॅक होणार उपलब्धपादचाऱ्याना चालण्यासाठी स्वतंत्र मार्गिकापाच कोटींचा केला जाणार खर्च