ठाणे: चेंदणी कोळीवाडा सिडको बसस्टॉप येथे गेल्या अनेक महिन्यांपासून अनाधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या खाजगी वाहन, खाजगी बसेस आणि परवानगी नसतानाही प्रवाशांची ने आण करणाºया रिक्षांमुळे वाहतूकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. या वाहनांच्या वाहनचालकांनी गांधीगिरीने न ऐकल्यास येत्या आठ दिवसांत खळ्ळखट्याक होईल असा इशारा मनविसेने दिला आहे.चेंदणी कोळीवाडा सिडको बसस्टॉप या परिसरात खाजगी बसेस, इको कार, तसेच, परवानगी नसतानाही रिक्षा अनाधिकृतपणे प्रवाशांची ने आण करीत आहे. त्यांनी या परिसरात व्यवसायासाठी आपले ठाण मांडले असून वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न भेडसावू लागला आहे. हा परिसर वाहतूक कोंडीच्या विळख्यात अक्षरश: अडकला आहे. टीएमटी, एनएमटी या बसेसना, वाहनचालकांना या तसेच, पादचाºयांना या ठिकाणी जाण्या येण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे. याआधीही या अनाधिकृत खाजगी वाहनांविरोधात स्थानिकांना आवाज उठविला होता. परंतू कालांतराने परिस्थिती जैसे थेच आहे. या वाहनांना व्यवसायाकरिता स्थानिक स्टँडची परवानगी नाही, त्यांच्याकडे परवाना तसेच, बॅचेसही नाही, या खाजगी वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यास वाहतूक नियंत्रण शाखा असमर्थ ठरत आहे असा आरोप मनविसेने केला आहे. स्थानिकांनीही या समस्येबाबत मनविसेला तक्रारींचे पत्र दिले आहे. या परिसरात अस्ताव्यस्त रिक्षा तसेच इको गाड्या उभ्या केल्या जाजत. यामधून शेअरिंग प्रवासी वाहतूक केली जाते. याबाबत प्रादेशिक परिवहन खात्याकडून माहिती घेतली असता त्या ठिकाणी कोणतेही रिक्षा स्टँड अस्तित्वात नसल्याचे त्यांच्याकडून सांगितले गेले. त्यामुळे कोणाच्या वरदहस्ताखाली हे वाहनचालक व्यवसाय करीत आहे याची चौकशी करुन त्यांच्यावर रितसर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी तेथील स्थानिक रहिवाशांनी मनविसेकडे केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी मनविसेचे तन्मय कोळी, नविन कोळी, कमलेश शार्दुल, दिनेश मांडावकर, अक्षय सन्मुख, अरुण घोसाळकर, परेश शिर्के, करण खरे या पदाधिकाºयांनी या वाहनचालकांना गांधीगिरीने समजाविले. त्यांना हार घालून गुलाबाचे फुल दिले आणि वाहतूकीचे नियम मोडत असल्याबाबत त्यांचे अभिनंदनही केले. आज हात जोडून सांगत आहोत उद्या हात सोडून सांगू असा इशाराही यावेळी दिला. येत्या आठ दिवसांत हा परिसर अनाधिकृत खाजगी वाहनमुक्त न झाल्यास खळ्ळखट्याक करण्यात येईल असे तन्मय कोळी यांनी सांगितले.
आधी गांधीगिरीने ऐका नाहीतर खळ्ळखट्याक होणारच - मनविसेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 4:44 PM
चेंदणी कोळीवाडा परिसरात अनाधिकृत खाजगी वाहन, बसेस, रिक्षांमुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
ठळक मुद्देनाहीतर खळ्ळखट्याक होणारच - मनविसेचा इशारावाहतूक कोंडीच्या विरोधात आंदोलनाचा इशाराआज हात जोडून सांगत आहोत उद्या हात सोडून सांगू - तन्मय कोळी