ठाणे : महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १० वीच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेचा निकाल लागण्याच्या प्रतिक्षेत आहे. मात्र, आॅनलाइन प्रवेशांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांचा आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्याचे पूर्ण करण्याचे काम शाळांवर सोपविले असून त्यात प्राप्त होणाऱ्या गुणांव्यतिरिक्त अन्य माहिती भरून घेण्याची जबाबदारी त्या पार पाडत आहेत.पहिल्या टप्यातील प्रवेश अर्जातील प्राथमिक माहिती भरल्यानंतर निकाल लागताच आॅनलाइनव्दारे गुणांची आकडेवारी अर्जात समाविष्ट होते. केवळ फॅकल्टीचे नाव विद्यार्थ्यांना अर्जात नमूद करण्याचे बाकी आहे. हा आॅनलाइन अर्ज भरण्याची संपूर्ण जबाबदारी शाळांवर दिली आहे. यासाठी मुख्याध्यापकांची बैठकही पार पडली. यानुसार शाळा विद्यार्थ्यांना बोलावून घेत त्यांचा आॅनलाइन अर्ज भरून घेण्याचा पहिला टप्पा शाळांनी जवळजवळ पूर्ण केल्याचे माध्यमिक शिक्षणचे सहायक शिक्षण निरीक्षक सुभाष गढरी यांनी सांगितले.यंदा एक लाख २१ हजार ६०८ विद्यार्थी १० वीच्या परीक्षेला बसले आहेत. यामधीाल उत्तीर्ण होण्याचे प्रमाण लक्षात घेऊन यंदा ठाणे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एक लाख १२ हजार ९० विद्यार्थ्यांच्या ११ वी प्रवेशाचे निश्चित केले आहेत. आपापल्या शालेतील विद्यार्थ्यांचे आॅनलाइन प्रवेशाचे अर्ज त्या त्या शाळा भरून घेत आहेत. परंतु, जिल्हयाबाहेरून येणाºया विद्यार्थ्यांना अर्ज भरून घेण्याचे मार्गदर्शन करण्यासाठी १४ केंद्र जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू केली जात आहेत.जिल्ह्याभरात ठाणे, कल़्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भार्इंदर असा शहरी भाग वगळता शहापूर, मुरबाड आणि भिवंडी तालुक्यातील विद्यार्थ्यांना आॅफलाइन प्रवेश घेता येणार आहे. या विद्यार्थ्यांनी केवळ जवळच्या शाळेत जाऊन प्रवेशासाठी त्यांचा अर्ज दाखल करणे अपेक्षित आहे.दहावीचा निकाल जाहीर झाला की ही प्रवेश प्रक्रिया वेग घेईल. त्यात विद्यार्थ्यांना वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतील. फॅकल्टीसह अन्य सर्व तपशील भरून दिल्यानंतर वेगवेगळ््या शाखांच्या वेगवेगळ््या फेºया पार पडतील आणि त्यानुसार प्रत्येक फेरीतील प्रवेश दिले जातील. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे महाविद्यालय निवडण्यासह इतर सर्व माहिती देण्याचे काम यापूर्वीच पार पडले आहे. त्यांचे गुण या प्रक्रियेत आॅनलाइन समाविष्ट होणार असल्याने त्यांची पडताळणी करण्याचे कामही सुलभ पद्धतीने पार पडेल.
११ वी आॅनलाइनचा पहिला टप्पा पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 2:20 AM