ठाणे : ठाणे महापालिकेसाठी गुरुवारी सकाळी १० वाजता ११ ठिकाणी मतमोजणी सुरू होईल आणि अवघ्या १५ मिनिटांत पहिला निकाल हाती येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली. दुपारी एकपर्यंत सर्व चित्र स्पष्ट झालेले असेल, असा दावा पालिकेच्या निवडणूक विभागाने केला. व्होटिंग मशीन या ११ जागांवर सुरक्षितरित्या ठेवल्या असून तेथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.पालिका मुख्यालयात मीडिया सेंटर स्थापन करण्यात आले आहे. तेथे व्हिडीओ कॉलिंगचीही सोय आहे. त्यातून आयुक्त सर्व मतमोजणी केंद्रांच्या संपर्कात असतील. प्रभाग २९ आणि ३३ म्हणजे दिवा आणि मुंब्रा येथून सर्वप्रथम निकाल हाती येण्याची शक्यता आहे. एकेका प्रभागाची मतमोजणी होताच अनौपचारिक निकाल घोषित होतील आणि प्रभागातील चारही वॉर्डांची मोजणी पूर्ण झाल्यावर त्यात्या प्रभागाचे निकाल अपलोड करत उमेदवारांना प्रमाणपत्र सोपविले जाईल.मतमोजणीसाठी आता महापालिका आणि पोलीस सज्ज झाले असून मतमोजणी केंद्रांवर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बंदोबस्तात वाढ केली आहे. मतपेट्यादेखील या ११ ठिकाणांवर पोहोचवल्या आहेत. मंगळवारी १७०४ मतदान केंद्रांवर मतदान पार पडल्यानंतर आता गुरुवारी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. (प्रतिनिधी)मतदार कमी तेथील निकाल लवकरज्या प्रभागातील मतदारांची संख्या कमी असेल, अशा प्रभागांचा निकाल प्रथम हाती येऊ शकतो, अशीही शक्यता आहे. दुपारी एकपर्यंत महापालिकेवर कोणाची सत्ता असेल, याचे संपूर्ण चित्र स्पष्ट झालेले असेल, असाही पालिकेचा दावा आहे. उल्हासनगरला अर्ध्या तासात पहिला निकाल उल्हासनगर : उल्हासनगरची मतमोजणी टाऊन हॉलमध्ये होणार आहे. अर्ध्या तासात पहिला निकाल हाती येईल, अशी माहिती आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली. दुपारी एकपर्यंत सर्व निकाल हाती येतील, असे ते म्हणाले. ७८ जागांसाठी ४७९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. हॉलसमोरील मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद केला ती अंबरनाथ-कल्याण रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. हॉलभोवती पोलिसांनी संरक्षणाचे कडे उभारले आहे. (प्रतिनिधी)या ठिकाणी होणार मतमोजणीअ.क्र.प्रभाग क्रमांकमतमोजणीचे ठिकाण१)१, २, ३, ८श्री माँ विद्यालय (पातलीपाडा)२)४, ५, ६डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रदर्शन स्मृती सभागृह३)६, १३,१४महिला बचत गट इमारत, वर्तकनगर४)१५, १६, १७आयटीआय. वर्कशॉप इमारत, रामनगर५)१८, १९ठाणे हेल्थ क्लब तरणतलाव, रहेजा संकुलसमोर६)२०, २१, २२दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह७)१०, ११, १२होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल८)९, २३, २४, २५सहकार विद्या प्रसारक मंडळ शाळा, कळवा९)२६, ३१ए.एफ. कालसेकर डिग्री कॉलेज, मुंब्रा१०)३०, ३२बॅडमिंटन हॉल, कौसा क्रीडा संकुल११)२७, २८ए.ई. कालेसकर कॉलेज, कौसा १२)२९,३३बॅडमिंटन हॉल, कौसा क्रीडा संकुलठाण्यातील नेत्यांच्या प्रतिक्रियामतदानाचा टक्का वाढवण्यात आयोगाला अपयश - पूर्णेकरठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी बाहेर पडलेल्या लोकांचा उत्साह सकारात्मक होता. परंतु, निवडणूक आयोगाने मतदानाचा टक्का वाढेल, अशी व्यवस्था केली नव्हती. त्याचबरोबर त्यांनी प्रामाणिकपणे काम न केल्याने याद्यांमध्ये घोळ झाल्याचे चित्र सर्वत्र दिसले. यामध्ये मृतांची नावे यादीत आणि ज्यांची नावे यादीत अपेक्षित होती, ती याद्यांमध्ये नसल्याने ते मतदानापासून वंचित राहिले. हे त्या आयोगाचेच पाप आहे. आयोगाच्या चुकीमुळेच मतदारांना त्रास झाला. या निवडणुकीचा निकाल हा मतदारच ठरवणार आहेत. सत्ताधाऱ्यांनी लोकांना गुमराह करून सत्ताधारी आणि विरोधक, अशी दुहेरी भूमिका प्रचारादरम्यान बजावली आहे. त्यामुळे आघाडीला याचा फायदा होईल, असा विश्वासही आहे. तर, आघाडीने ठरवलेल्या रणनीतीत जरी आम्ही १०० टक्के यशस्वी ठरलो नसलो, तरी ती काही प्रमाणात यशस्वी झालो आहे. विरोधकांनी मात केली असे म्हणायचे, तर त्यांनी केलेली जाहिरातबाजी आणि पैशांचा अलोट वापर यामध्ये आम्ही मागे पडलो, असेच म्हणावे लागेल. सत्ता स्थापनेसाठी मनसेच किंगमेकर असेल -जाधवठाणे : मनसेशिवाय सत्ता बसू शकणार नाही. २००७ व २०१२ मध्येही मनसेच्या पाठिंब्यामुळे सत्ता बसली होती. आता २०१७ मध्येही मनसेच किंगमेकर ठरेल. यंदा तरुणवर्ग मतदानासाठी आवडीने उतरला आहे. राज ठाकरे यांची प्रशंसा मतदारांकडून ऐकायला मिळत होती. नाशिकमध्ये त्यांनी केलेल्या कामाचेही कौतुक होत होते. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा वाढलेला टक्का हा नक्कीच मनसेकडे वळेल. नाशिकमध्ये केलेल्या विकासकामांचा परिणाम ठाण्यातील मतदानावर नक्कीच झाला. या निवडणुकीत उमेदवाराकडे नव्हे, तर राज ठाकरे यांच्याकडे पाहून मतदान झाले. त्यांनी प्रचार सभेत दिलेल्या प्रेझेंटेशनमुळे मतदारांचे नक्कीच मतपरिवर्तन झाले आहे. अमेरिकेतील राजकीय नेते हे आपल्या भाषणात प्रेझेंटेशन देतात. परंतु, भारताच्या राजकारणात पहिल्यांदा प्रचार सभेत प्रेझेंटेशन देण्यात आले आणि ते फक्त राज ठाकरे यांनी केले. मतदारांना हे नक्कीच आवडले आहे आणि मतदान करून आल्यावर त्यांनी प्रेझेंटेशन आवडल्याचे मतदार आम्हाला सांगत होते. आम्ही अनेक प्रभागांत शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांना धक्के देणार आहोत. १० प्रभागांतील १६ जागांवर आमचे लक्ष्य होते. त्या जागांवर आम्ही खूप मेहनत घेतली. अंदाजे सात ते दहा जागांवर मनसेचा झेंडा फडकेल. आमच्या उमेदवारांनी ज्या प्रभागांत उत्तम काम केले होते, त्यांना आम्ही पाठिंबा दिला, त्यांच्या मताचा टक्का वाढवण्यासाठी खूप ताकद लावली. विरोधक हे पैशाने गडगंज असल्याने त्यांनी भरपूर पैसे खर्च करून आमच्यावर मात केली. याद्यांचा प्रचंड घोळ झाला. निवडणूक आयोगाची यंत्रणा कुचकामी ठरली. या निवडणुकीत शिक्षकांचा वापर करण्यात आला होता. पण, त्यांनी नीट कामे केली नाहीत. वेगळी यंत्रणा उभारणे गरजेचे होते. प्रतिष्ठित लोकांची नावे मतदारयाद्यांतून गायब झाली. संपूर्ण सोसायट्यांतील मतदारांची नावे यादीत नव्हती आणि हे खूपच भयानक आहे. सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागेल - आव्हाड ठाणे : ठाणे महापालिकेत सत्ता स्थापण्यासाठी इतरांना राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घ्यावी लागेल. राष्ट्रवादीशिवाय सत्ता स्थापन होणार नाही. शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळणार, असे जरी सर्व जण म्हणत असले आणि ते खरे मानून त्यांना ६० जागा मिळतील, हे मान्य केले तरी ७१ जागा इतर पक्ष व छोटे पक्ष यांच्याकडे उरतात. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची असेल. मात्र, यावर लागलीच भाष्य करणे योग्य होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. मतदार खुलून बोलत नाहीत. मतदान गुप्त राहावे, हाच लोकशाहीचा विजय आहे. हेच सांसदीय लोकशाहीत अभिप्रेत आहे. प्रचाराची रणनीती किती यशस्वी झाली, ते निकालानंतरच सांगता येईल. मतदारयाद्यांमधील घोळाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केलेली आहे. (प्रतिनिधी)
१५ मिनिटांत पहिला निकाल
By admin | Published: February 23, 2017 6:08 AM