शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

आंध्रा धरण पाच वर्षात प्रथमच ९२ टक्के भरले, पाणीसमस्येला यंदा पूर्णविराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 2:21 AM

जिल्ह्यातील पाच महापालिका, दोन नगरपालिका आणि जि.प.च्या ४५ गावपाड्यांना उल्हासनदीव्दारे पाणीपुरवठा करणारे आंध्रा धरण पाच वर्षात प्रथमच ९२.५४ टक्के सोमवारी भरले. यामुळे पिण्याच्या पाण्यासह उद्योगधंद्यांच्या पाणीसमस्येला यंदा पूर्णविराम मिळाला आहे.

सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्यातील पाच महापालिका, दोन नगरपालिका आणि जि.प.च्या ४५ गावपाड्यांना उल्हासनदीव्दारे पाणीपुरवठा करणारे आंध्रा धरण पाच वर्षात प्रथमच ९२.५४ टक्के सोमवारी भरले. यामुळे पिण्याच्या पाण्यासह उद्योगधंद्यांच्या पाणीसमस्येला यंदा पूर्णविराम मिळाला आहे.कर्जतजवळील भिवपुरीजवळ आंध्रा नदीवरील पुणे जिल्ह्यात असलेले हे धरण टाटा कंपनीच्या मालकीचे आहे. त्यावर ७२ मेगावॅटचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट कार्यरत आहे. यासाठी वापरलेले पाणी उल्हासनदीत सोडले जाते. त्याचा लाभ ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि उद्योगांना होतो. या धरणातील मागील पाच वर्षातील सरासरी उपयुक्त पाणीसाठा २३५.३८ दशलक्ष घनमीटर होता. मात्र, यंदा प्रथमच ३१३.८४ दशलक्ष घनमीटर (दलघमी.) म्हणजे ९२.५४ टक्के उपयुक्त पाणीसाठा तयार झाला आहे. सुमारे ९४२.१० दलघमी पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या भातसा धरणानंतर या आंध्रा धरणाची ३३९.१४ दलघमी उपयुक्त पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणात मागील वर्षी २२७.७५ दलघमी म्हणजे ६७.१६ टक्के पाणीसाठा होता. तो यंदा ९२ .५४ टक्के तयार झाला आहे. या खोºयात यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे या धरणात झपाट्याने पाणी जमा होत आहे. आतापर्यंत धरणात २४६१ मिमी. पाऊस पडला असून मागील वर्षी याच दिनांकापर्यंत २१४३ मिमी. पाऊस पडला होता.आंध्रा धरण्याचे पाणी भिवपुरी, भिरा येथील टाटाच्या विद्युत प्रकल्पात सोडले जाते. त्यानंतर उल्हास नदीव्दारे ठाणे जिल्ह्यात येणारे हे पाणी बारवी धरणासह बदलापूर बंधारा, जांभूळ बंधारा, मोहने बंधारा आदी ठिकाणी अडविण्यात येते. त्यानंतर एमआयडीसी, शहाड टेमघर, कल्याण-डोंबिवली, जीवन प्राधिकरण आदी प्रमुख संस्था या पाण्याचा पुरवठा पाच महापालिका, दोन नगरपालिका आणि औद्योगिक कारखान्यांना करतात. आंध्रा धरणासह बारवी धरणातही १०० टक्के पाणी साठ््यामुळे ठाणे पालिकेच्या काही भागांसह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर, बदलापूर आणि अंबरनाथ आणि भिवंडी तालुक्यातील ४५ गावांची पाणीटंचाईची समस्या दूर झाली आहे.

टॅग्स :Damधरण