हुसेन मेमन, जव्हारया तालुक्यातील कुतुरविहीर या साधारण 200 घरांच्या व 800 च्या आसपास लोकसंख्या असलेल्या आदीवासी गावाला प्रथमच नळपाणी लाभले आहे. अदयाप स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनाच नसल्यामुळे गेल्या अनेक पिढ्यानिपढ्या येथील महिला गावापासून 2 कि.मी.दूर असलेल्या विहिरी वरु न हंडा कळशी ने डोक्यावरून पाणी आणत. यात लहान मुले, पुरुष देखील कुटुंबाला पुरेल एवढे पाणी आणण्यासाठी दिवस रात्र विहिरीवर चकरा मारत. एका एका हंड्यासाठी दोन दोन तास नंबर लावावा लागल्याने पुरुष रोजगार बुडवून, महिला इतर कामे सोडून तर विद्यार्थी शाळेला दांडी मारून विहिरीवरून पाणी आणत होते.या गावाची पाण्यासाठी होणारी ओढाताण प्रगती प्रतिष्ठानच्या सचिव सुनंदाताई पटवर्धन यांच्या कानी गेली. त्यांनी प्रत्यक्ष गावाला भेट देवून काय करता येऊ शकतात याचे सर्वेक्षण केले. त्यांना गावात पाण्याचा इतर स्त्रोत नसल्याने याच विहिरी वरून नळपाणीपुरवठा योजना केल्यास गावात ठीक ठिकाणी सार्वजनिक नळाद्वारे पाणी आणता येवू शकते हाच एक पर्याय समोर आला. परंतु दोन कि.मी. पाईप लाईन, इलेक्ट्रिक मोटार पंप, 10 हजार लिटर पाण्याची टाकी , 10 स्टँड पोस्ट व मजूरी इत्यादी खर्च अपेक्षित असल्याचे ग्रामस्थांना सांगितले. त्यासाठीचा अंदाजित खर्च 10 लाखांच्या घरात जात होता. अगोदरच रोजगारासाठी स्थलांतरित व्हावे लागत असल्याने ऐवढी मोठी रक्कम जमा करने ग्रामस्थाना अशक्य होते. म्हणून ताईनी आर्थिक मदतीसाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले. त्याला यश येवून मुंबई येथील सावली चॅरीटेबल ट्रस्टने आर्थिक मदतीचा हात पुढे केला. ट्रस्टचे अध्यक्ष विनायक देवधर व सुभाष पेढे यांनी गावकर्यांची मिटिंग घेतली. आपण सर्वांनी श्रमदान केल्यास निश्चितच आर्थिकभार कमी होऊ शकतो म्हणून ग्रामस्थांनी श्रमदान केले. व मजुरीवर होणाऱ्या अंदाजे 3 लाखांच्या खर्चाची बचत झाली व योजनाही तत्परतेने साकार झाली.
कुतुरविहीरात प्रथमच पोहोचले नळपाणी
By admin | Published: April 25, 2016 2:55 AM