ठाणे : ठाण्यात प्रथमच ‘अकाऊंटींग म्युझियम ऑफ इंडिया’ उभारले जाणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट ऑफ इंडिया आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ३० ऑगस्ट रोजी त्याचे उद्घाटन होणार आहे.
यासाठी ठाण्यात प्रथमच ४४ फुटांची वॉल ऑफ अकाऊंटन्सी तयार केली आहे. या भिंतीवर अकाऊंटन्सीचा प्रवास उलगडण्यात येणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सीए निहार जंबूसारिया यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने या वॉलचे उद्घाटन होणार आहे तर आयसीएआय वेस्टर्न इंडिया रिजनल काैन्सिलचे चेअरमन मनीष गाडीया हे प्रत्यक्षात ही उद्घाटनासाठी ठाण्यात येत आहेत. त्याचबरोबर व्हाईस चेअरमन दृष्टी देसाई, सेक्रेटरी अर्पित काबरा, खजिनदार जयेश काला, कार्यक्रमाचे समन्वयक सीए योगेश प्रसादे, आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन मोरे, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. संतोष गावडे उपस्थित राहणार आहेत.