भार्इंदर/मीरा रोड : भार्इंदरच्या उत्तन येथील समुद्रात बुडणाºया बारावीच्या तिघा विद्यार्थ्यांना स्थानिक मच्छीमारांनी रविवारी सकाळी वाचवले. ही तीनही मुले भार्इंदरची असून समुद्रातील खडकावर जाऊन सेल्फी काढत होते. पण, काही वेळातच भरतीचे पाणी वाढून ते पाण्यात अडकले.भार्इंदर पूर्वेच्या तलावमार्गावरील तुळशी इमारतीत राहणारा विशाल मोहन मिंडे (१९), शिर्डीनगरमध्ये राहणारा सचिन शेखर वाघमारे (१६) आणि नवघरमार्गावरील गीता भवनमध्ये राहणारा सुमित लवजी कटपरा (१८) हे तिघे बारावीचे विद्यार्थी रविवारी सुटी असल्याने सकाळी ८ च्या सुमारास उत्तनच्या वेलंकनी तीर्थमंदिराजवळील समुद्रात गेलेहोते. ओहोटी असल्याने ते खडकावर जाऊन बसले. मात्र, सेल्फी काढायच्या नादात पाणी कधी वाढले, हे त्यांना कळलेच नाही. काही वेळातच पाणी वाढून तिघेही जण पाण्यात बुडू लागले. शिवाय, लाटादेखील जोरात होत्या. या तिघांनी जीवाच्या आकांताने आरडाओरडा सुरू केला.त्याचवेळी वेलंकनी तीर्थमंदिरात सकाळी साडेआठची प्रार्थना सुरू होती. समुद्रात तीन मुले बुडत असल्याचे समजताच तेथे असलेल्या स्थानिक नगरसेविका शर्मिला गंडोळी (बगाजी) यांनी अग्निशमन दल आणि उत्तन सागरी पोलिसांना घटनेची माहितीदिली. खवळलेला समुद्र आणि तीनही मुले बुडण्याची शक्यता पाहता शर्मिला यांचे पती अजितसह गॉडवीन गौºया, ग्रीसीन गोन्साल्विस, फ्रीडम लांगी या स्थानिक मच्छीमार तरुणांनी समुद्रात उड्या घेतल्या.>तिन्ही मुलांना धरून सुखरूप किनाºयावर आणले. ही तीनही मुले खूपच भेदरलेली होती. दरम्यान, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांनी त्या तरुणांना समुद्राबाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांना सहकार्य केले. या घटनेमुळे हे विद्यार्थी प्रचंड घाबरले होते. पोलिसांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना त्यांच्या घरी सोडले.
समुद्रात बुडणाऱ्या तिघांना मच्छिमारांनी वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 2:25 AM