शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

किवाची मासेमारी जोरात, रोजगाराची संधी

By admin | Published: September 26, 2016 2:07 AM

परतीच्या पावसात शेताशेतांच्या बांधाबांधांवर होणारी किवाची मासेमारी शहापूर तालुक्यात जोरात सुरू असून यामुळे स्थानिकांना चांगला रोजगारही मिळत आहे.

भातसानगर : परतीच्या पावसात शेताशेतांच्या बांधाबांधांवर होणारी किवाची मासेमारी शहापूर तालुक्यात जोरात सुरू असून यामुळे स्थानिकांना चांगला रोजगारही मिळत आहे.पावसाळ्यातील जवळपास सर्वच कामे आटोपल्यावर शेतकरी आपापल्या शेतावर किंवा ओढ्यानाल्यांवर मासेमारीसाठी नालेओढ्यांतील पाणी अडवून त्याला सागाची पाने, दगड, झाडांचे वासे यांच्या साहाय्याने अडवलेले पाणी समोरच्या बाजूंनी सोडून प्रवाहात मासेमारी करतात. पावसाळ्यात जोरदार पाऊस पडताच नदीनाल्यांतील, धरणांतील मासे प्रवाहाबरोबर शेतात, डबक्यात अंडी सोडतात. परतीच्या पावसाबरोबर त्याच अंड्यांपासून तयार झालेले मोठे मासे आता पुन्हा नदीनालेओढ्यांतून जात असल्याने नेमक्या याच मार्गांवर किवाच्या साहाय्याने मासेमारी केली जाते. आज तालुक्यात सर्वच गावपाड्यांवर अशा प्रकारची मासेमारी होत आहे. या मासेमारीमुळे मोठ्या प्रमाणात मासे मिळत असून त्यामध्ये कडवावाळी, टोके, दंडावनी, मळे, वाई , पितोली, मुरे, खापू, चिचे, डाके, शिंगाले, वालंजी हे कॅल्शियमयुक्त मासे मिळत आहेत. या लहान माशांमुळे शरीराला मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळत असल्याने शरीराची हाडे मजबूत होण्यास व डोळे तेज होण्यास मदत होते. हे मासे ३०० रु पये किलो, तर २० रु पये एक केजा (पानावर एक मूठभर मासे ठेवून ते पसरून देण्याचे एक माप), तर सुकवलेले मासे ५०० ते ६०० रु पये पायली, याप्रमाणे विकले जात आहेत. यामुळे ग्रामीण भागातील लोकांना चांगला रोजगार मिळत आहे. वर्षभर पुरतील इतके मासे वाळवून ठेवण्याची लगबगही सुरू आहे.