ठाणे : देश स्वातंत्र्याला ७५ वे वर्ष असल्याच्या पार्श्वभूमीवर नेहरू युवा केंद्र ठाणे, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत शनिवारी उल्हासनगर येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे क्रीडांगणात ‘आझादी का अमृत महोत्सव - इंडिया ७५’ या कार्यक्रमाअंतर्गत ‘फ्रीडम रन’ कार्यक्रम पार पडला. यामध्ये विशेषतः खेळाडूंसह युवक-युवतींनी सहभाग घेतला. त्यामध्ये सह्याद्री करिअर अकादमी, उल्हासनगर व विश्वास अकॅडमी, अंबरनाथ यांच्या खेळाडू युवक-युवतींचा विशेष सहभाग होता.
राष्ट्रगीत व फिट इंडिया फ्रीडम रन २.० ची प्रतिज्ञा घेऊन फ्रीडम रनची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी उल्हासनगर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून ७ किलोमीटर रन केले. नंतर परत मैदानात येऊन शॉट्स पुट्स, पूल अप्स, व १०० मीटर धावणे अशा खेळाच्या स्पर्धा घेतल्या. यावेळी राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू सचिन जाधव, राष्ट्रीय पातळीवरील मॅरेथॉन खेळाडू संकेत देशमुख आदींसह नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी निशांत रौतेला यांनी युवकांना मार्गदर्शन केले. लेखापाल ज्योती राणी व सुनील गमरे, प्रशिक्षक विनय संकेत, जितू हाटकर उपस्थित असल्याचे वेंकटेश वेमुगंटी यांनी सांगितले.