लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ही पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहे. यापैकी तीन दरवाजे 0.50 मीटर म्हणजे अर्धा मीटर ने तर दोन दरवाजे 0.25 म्हणजे पाव मीटरने उघडले आहे. तर बारवी धरणाचे स्वयंचलित दरवाजे पाणी जादा होताच कोणत्याही क्षणी उघडणार आहे. यामुळे भातसा व बारवी धरणाखालील व या नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भातसा धरणाचे उघडण्यात येणार्या पाच दरवा ज्यांपैकी 1,3 आणि पाच क्रमांकाचा दरवाजा 0.50 मीटर म्हणजे अर्धा मीटरने तर 2 व 4 क्रमांकाचे दरवाजे 0.25 म्हणजे पाव मीटरने उघडले आहे. यामुळे भातसा धरणातील 212.875 क्युमेक्स म्हणजे 7517.681 क्युसेक्स पाण्याचा प्रवाह विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून भातसा नदीपात्रातील पाणी वाढून शहापूर - मुरबाड रस्त्यावरील सापेगांव पूल पाण्याखाली जाणार आहे. तर सापेगांव व या नदी काठावरी गावांना सतर्कतेचा इशारा संबंधीत सरपंच, तलाठी आणि ग्रामसेवकांद्वारे भातसानगर येथील पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी लेखी पत्राद्वारे सूचित केला आहे. बारवी धरणाचे स्वयंचलित दरवाजे पाणी जादा होताच कोणत्याही क्षणी उघडणार आहे. यामुळे भातसा व बारवी धरणाखालील व या नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बारवी धरण व नदी काठावरील अंबरनाथ तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा संबंधी तलाठी, ग्राम सेवक आणि सरपंच यांच्या मार्फत देण्यात आला आहे. या मध्ये अस्नोली, राहटोली, चोण, सागांव पाटीलपाडा, चांदप, पादीर पाडा, पिंपळोली , कारंद, चांदप पाडा आदी गांवांसह नदी काठावरील गांवाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, एम आयडीसी क्षेत्राला पाणी पुरवठा करणार्या बारवी धरणात आज रात्री पासून जोरदार पाऊस सुरु आहे. 86 मिमी पाऊस सकाळपर्यंतधरणात पडला आहे. आता यााबारवी धरणात 95.35 टक्के पाणी साठा तयार झाला आहे. धरणाच्या 72.60 मीटर पाणी पातळी पैकी भरण्यासाठी केवळ 0.45 मीटर पाणी पातळी बाकी आहे. या धरणाच्या स्वयंचलित दरवाज्यातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने या धरणासह बारवी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या नदीच्या पात्रात व वाहत्या पाण्यााची पातळी वाढणार असल्यामुळे या पाण्यात उतरण्याला बंदी घातली आहे.या सतर्कता इशारा स्थानिक प्रशासनाकडून संबंधित गावांना देण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे सीईओ शिवाजी पाटील यांनी जारी केले आहेत. याशिवाय या धरणाची मालकी असलेल्या एम आयडीसी विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी ही संबंत प्रशासनास सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात कालपासून पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठाणे शहरात 101 मिमी गेल्या 24 तासात पडल्याची नोंद ठाणे मनपाने घेतली आहे. तर 4 आगीच्या घटनांसह गांवदेवी मैदानाजवळील पत्रकार भवनची इमारत धोकादायक स्थितीत आहे. नौपाडा येथे दोन कारवर एक झाड उन्मळून पडले. आजही एक तासाच्या कालावधीत 13 मिमी पाऊस ठाणे शहर परिसरात पडला आहे.
* जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये सरासरी 47.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. यामध्ये ठाणे तालुक्यात 46 मिमी, कल्याण 45, मुरबाड 20, भिवंडी 63, उल्हासनगर 78 आणि अंबरनाथला 67 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. * भातसा 97.82 टक्के पाणी साठा तयार झाला, तर आंध्रा 65.51 टक्के, मोडक सागर 100 टक्के, तानसा 99.26 टक्के आणि मध्य वैतरणा धरणात आतापर्यंत 95.35 टक्के, तर बारवी धरणातही 95.35 टक्के पाणी साठा तयार झाला आहे.