कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत आज कोरोनाची लागण झालेली नवे पाच रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीतील कोरोना बाधितांची एकूण रुग्ण संख्या 55 झाली आहे. ठाणो उपनगरातील अन्य महापालिका व पालिकांच्या हद्दीत आढळून आलेल्या रुग्णांच्या संख्येत कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या मोठी आहे.
महापालिका हद्दीत नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये डोंबिवली पूव्रेतील 19 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. उर्वरीत चार रुग्ण हे कल्याण पूव्रेतील आहेत. त्यात 12 आणि 15 वर्षाच्या दोन मुली, 15 वर्षाचा मुलगा आणि 43 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील एकूण 55 रुग्णांपैकी डोंबिवली पूव्रेत रुग्णांचा संख्या जास्त आहे. डोंबिवली पूव्रेत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 19 आहे. टिटवाळा परिसरात रुग्णांची संख्या दोन आहे. महापालिका हद्दीत यापूर्वी कोरोना बाधित रुग्णांपैकी दोन महिलांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे.
सगळ्यात दिलासा देणारी बाब म्हणजे कोरोना बाधित सहा महिन्याच्या बालकाने कोरोनाला मात दिली आहे. कल्याण पश्चिमेतील एका सोसायटीतील सहा महिन्याच्या बालकाला कोरोनाची लागण झाली होती. त्याला उपचारासाठी मुंबईच्या कस्तूरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलाचे काम होणार या भितीने त्याचे पालक धास्तावले होते. मात्र या सहा महिन्याच्या बालकाने कोरोना मात दिली आहे. हे बालक कोरोना आजारातून बरे झाल्याने त्याला काल रुग्ण वाहिकेतून कल्याण प्श्चिमेतील त्याच्या सोसायटीत सोडण्यात आले. यावेळी सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ रुग्णवाहिका येताच सोसायटीतील सदस्यांनी त्यांचे टाळ्य़ा वाजवून जोरदास स्वागत अशी माहिती मनसेच्या नगरसेविका कस्तूरी देसाई यांनी दिली. बाळाची यापूढेही काळजी घेतली जाईल. त्याला वेळोवेळी तपासणीकरीता पाठविले जाईल असा विश्वास बाळाच्या पालकांच्या वतीने देसाई यांनी व्यक्त केला आहे.आत्तार्पयत महापालिका हद्दीतील कोरोना बाधित 12 रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्या कोरोना बाधितांची संख्या 37 आहे.
दरम्यान महापालिका हद्दीत सगळ्य़ात आधी कल्याण पूव्रेतील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. तो अमेरिकेहून कल्याणला 6 मार्च रोजी परतला होता. त्याच्या तीन वर्षाच्या मुलीसह त्याच्या पत्नीला ही लागण झाली होती. तीन वर्षाच्या मुलीने सगळ्य़ात आधी कोरोनावर मात केली होती. तिलाही घरी पाठविण्यात आले होते. त्या पाठोपाठ कल्याण पश्चिमेतील सहा महिन्याच्या बाळाने कोरोनाला हरविले आहे.
डोंबिवली शहराच्या हद्दीला लागून असलेल्या कोपर, भोपर, संदप, उसरघर या परिसपासून जवळच दिवा आहे. या दिव्यात काल एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने त्याठिकाणी पाहणी करण्यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी धाव घेऊन ठाणो महापालिकेने व जिल्हाधिका:यानी तातडीने दिव्यातील कोरोना संशयीताची चाचणी करावी. तसेच निजर्तूकीकरण, धूर फवारणी करण्याची मागणी केली आहे.