मुंब्रा : डोंबिवली, शीळफाटा, वाशी, मुंब्रा, कौपरखैरणे येथील डॉक्टरांना कारवाई करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून लाखो रुपये लुबाडलेल्या दोन महिलांसह पाच तोतया पोलिसांना कौपरखैरणे पोलिसांनी शुक्र वारी अटक केली.
२३ आॅगस्टला नदीम बेग या डॉक्टरांच्या शीळफाटा येथील दवाखान्यात गर्भपाताच्या गोळ्या घेण्यासाठी गेलेल्या महिलेला डॉक्टरांनी हे औषध आम्ही देत नसल्याचे सांगितले. त्याचवेळी त्यांच्या दवाखान्यात शिरलेल्या चार जणांनी दवाखान्याचे शटर बंद करून क्राइम ब्राँचचे पोलीस असल्याची बतावणी केली. डॉक्टरच्या टेबलावर आढळलेल्या कथित गर्भपाताच्या गोळ्या ते देत असल्याचा आरोप करत त्यांनी डॉक्टरांना कारवाईची धमकी दिली. त्यातून वाचण्यासाठी त्यांनी बेग यांच्याकडे दोन लाख रु पयांची मागणी केली. तडजोडीअंती दीड लाख देण्याचे त्यांनी मान्य केले. याबाबत, त्यांनी कौपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली. त्यावरून पैसे घेण्यासाठी हॉटेलमध्ये आलेल्या संदीप कांबळे, अशोक गिरवडे, शैलेश यादव, अनिता थापा आणि सविता जाधव यांना पोलिसांनी अटक केली.