ठाणे - यावर्षी कोरोनाच्या सावटाखाली अतिशय साध्या पध्दतीने दिड, पाच, सहा आणि सात दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. यानंतर आता 11 दिवसांच्या बाप्पालाही याच पद्धतीने निरोप दिला जावा यासाठी पालिका यंत्रणा आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयात 30 हजार 919 खाजगी आणि 364 सार्वजनिक गणरायांना निरोप दिला जाणार आहे. यासाठी पोलीस आयुक्तालयात पाच हजारांचा पोलीस फौजफाटा बंदोबस्तासाठी सज्ज झाला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गणेशोत्सव काळात काढण्यात येणाऱ्या आगमन आणि विसर्जन मिरवणूकांना राज्य सरकारकडून घातलेली बंदी, रद्द झालेले काही सार्वजनिक गणेशोत्सव तसेच महापालिकांचे ‘विसर्जन आपल्या दारी’ या संकल्पनेमुळे यावर्षीचा गणेशोत्सवात पोलिसांचा बंदोबस्तावरील ताण काहीसा हलका झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी गणेशोत्सवात पोलिसांना बंदोबस्तासाठी अतिरिक्त फौजफाटा तैनात करावा लागतो. बंदोबस्तातील ताण हलका झाला असला तरी ठाणे, ते बदलापूर आणि भिवंडी शहरात नियंमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुमारे 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात असणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले. ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरांत यावर्षी 30 हजार 919 खाजगी आणि 364 सार्वजनिक बाप्पांचे विसजर्न केले जाणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. सरकारच्या विविध मार्गदर्शक सूचना, करोनाचा संसर्ग आणि प्रायोजकत्वाचा अभाव यामुळे अनेक गणेशोत्सव मंडळांनी उत्सवातील आपला हात आखडता घेतला आहे. तर काही मंडळांनी परंपरेत खंड पडू नये यासाठी दीड दिवसांचा गणेशोत्सव आयोजित केला होता. त्यामुळे पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताणही बऱ्यापैकी कमी झाल्याचे दिसून आले.
गणेश विसर्जनासाठी महापालिकेने घरच्या घरी गणेशमूर्ती कशा पद्धतीने विसर्जित करता येतील. याची माहिती दिली आहे. तसेच ‘विसर्जन आपल्या दारी’ ही संकल्पनाही आणली आहे. यात महापालिकेचे वाहन येऊन गणेशमूर्ती विसर्जन करणार आहे. तर काही गृहसंकुलांनी त्यांच्या संकुलात विसर्जन हौद तयार केले आहेत. त्यामुळे विसर्जन काळातही कृत्रिम तलाव, गणेश विसर्जन घाट येथील गर्दी कमी असणार आहे.
असे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून गणेश आगमन आणि विसर्जनात मिरवणुका निघणार नाही. याकडे पोलिसांची नजर असणार आहे. तसेच विसर्जन घाट, कृत्रिम तलाव येथेही विविध 35 पोलीस ठाण्यातील 5 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यासह एक शीघ्रकृती दलाची कंपनी, राज्य राखीव दलाच्या चार कंपन्या ठाण्यात दाखल झाल्या आहेत. तसेच एक बॉंब शोधक पथकही असणार आहे. हे पथक कृत्रिम तलाव, विसजर्न घाट येथे तपासणी करणार आहे.
विसजर्न स्थळ, कृत्रिम तलाव -मासुंदा तलाव, खारेगाव, रेवाळे, पायलादेवी मंदिर, उपवन, निलकंठ हाईट,रायलादेवी तलाव नं.1, तलाव नं.2, घोसाळे तलाव, खिडकाळी, कोलशेत विभाग, ब्रम्हांड, दातीवली, न्यू शिवाजी नगर येथील 13 ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे.
विसजर्न घाट - 7 ठिकाणीकोपरी, कळवा पूल (ठाणो बाजू) कळवा पूल निर्सग उद्यान), बाळकूम घाट, पारसिक रेतीबंदर, कोलशेत, दिवा. याशिवाय 20 मूर्ती स्विकृती केंद्रही तयार करण्यात आले आहेत.
सार्वजनिक आणि खाजगीगणपतींची संख्यापरिमंडळ सार्वजनिक खाजगीपरिमंडळ 1 - ठाणो 29 6881परिमंडळ 2 भिवंडी 82 2720परिमंडळ 3 कल्याण 97 9602परिमंडळ 4 उल्हासनगर 101 6965परिमंडळ 5 वागळे इस्टेट 55 4751एकूण 364 30919