ठाणे : ठाण्याहून घोडबंदर रोडकडे आई- वडिलांसोबत जात असलेला पाच वर्षीय चिमुरड्याचा ब्रह्मांड सिग्नलजवळ ठाणे महानगरपालिकेच्या टँकरच्या मागील चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या आई-वडिलांना किरकोळ दुखापत झाली.
कशेळी भिवंडी येथे राहणारे राजेश बाबाजी जाधव हे त्यांची पत्नी दर्शना जाधव व मुलगा आरुष यांच्यासोबत दुचाकीवरून ठाण्याहून घोडबंदरकडे जात असताना ब्रह्मांड सिग्नलजवळ हा अपघात झाला. ठामपा पाणीपुरवठा विभागाचा चालक देवेंद्र सीताराम शिंदे (५३) यांच्या ताब्यातील टँकरच्या मागील चाकाखाली आल्याने न त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात राजेश जाधव (३३) आणि दर्शना जाधव (२९) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.